काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका प्रभावीपणे बजावत नसल्याची टीका केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी येथे केली. क्षुद्र राजकारण करण्यापेक्षा काँग्रेसने शांत बसावे आणि काँग्रेसने सहा दशकांच्या कालावधीत जी कामे केली नाहीत ती एनडीए सरकार कशी पूर्ण करते ते पाहावे, असे नायडू म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुटाबुटावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी टीका केली त्याचा संदर्भ देऊन नायडू म्हणाले की, ज्या कुटुंबीयांनी सर्वाधिक राज्यकारबार केला ते मोदी यांच्या सुटाबुटावर आता टीका करीत आहेत, तुमच्या आजोबांनी आणि वडिलांनी कधी सूट परिधान केला नाही का, असा सवालही नायडू यांनी केला. ही वस्तुस्थिती असताना तुम्ही सुटाबुटावर अशी ओरड का करता, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 10th May 2015 रोजी प्रकाशित
राजकारणापेक्षा एनडीएचा कारभार पाहा- नायडू
काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका प्रभावीपणे बजावत नसल्याची टीका केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी येथे केली.

First published on: 10-05-2015 at 03:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch how nda government performs venkaiah naidu