आगामी काळात केंद्रात सत्तास्थापनेसाठी तिसऱया आघाडीला पाठिंबा देणार नसल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी अमेठीत स्पष्ट केले आहे.
अमेठी मतदारसंघाचे उमेदवार राहुल गांधी प्रथमच प्रचारासाठी अमेठीत आले. प्रत्येक गरिब नागरिकास घर, रुग्णालयात मोफत उपचार आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकास पेन्शनची हमी त्यांनी दिली. “आम्ही सत्तेसाठी तिस-या आघाडीला पाठिंबा नाही देणार. हम कोइ जोड तोड नही करेंगे, हमारे पुरे नंबर आयेंगे” असा विश्वास राहुल यांनी माध्यांसमोर व्यक्त केला. यापूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी मोदींना सत्तेपासून वंचित करण्यासाठी काँगेस तिसऱया आघाडीला पाठिंबा देईल असे वक्तव्य केले होते. यालाच उत्तर देत राहुल गांधी यांनी तिसऱया आघाडीला सोबत घेणार नसल्याचे सांगितले आहे.
तसेच, त्यांनी यावेळी अमेठीतील जनतेला काँग्रेसची सत्ता पुन्हा स्थापन होईल असे आश्वासन दिले.
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2014 रोजी प्रकाशित
सत्तास्थापनेसाठी तिसऱया आघाडीला पाठिंबा देणार नाही- राहुल गांधी
आगामी काळात केंद्रात सत्तास्थापनेसाठी तिसऱया आघाडीला पाठिंबा देणार नसल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी अमेठीत स्पष्ट केले आहे.

First published on: 04-05-2014 at 04:58 IST
TOPICSकाँग्रेसCongressनिवडणूक २०२४Electionभारतीय जनता पार्टीBJPराजकारणPoliticsराहुल गांधीRahul Gandhi
+ 1 More
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We wont support any third front koi jod tod nai karenge rahul gandhi