कोट्यवधी मोबाईलधारक ज्या ‘अॅप’च्या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असतात, त्या ‘वॉट्सअप’चे वेब ब्राऊजर व्हर्जनही अस्तित्त्वात आले असून, नेटिझन्स आता आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरूनही या अॅपचा वापर करू शकतात.
गेल्या काही महिन्यांपासून या नव्या सुविधेची वाट बघितली जात होती. या नव्या सुविधेमुळे वॉट्सअपवरील संदेश वाचण्यासाठी प्रत्येकवेळी मोबाईल बघण्याची गरज पडणार नाही. वॉट्सअपच्या ब्लॉगवर या नव्या सुविधेबद्दल माहिती देण्यात आली आहे.
कोणत्याही नेटिझन्सला हे अॅप लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर सुरू करण्यासाठी क्रोम ब्राऊजरमधून https://web.whatsapp.com या संकेतस्थळावर जावे लागेल. तिथे गेल्यावर दिसणारा क्यूआर कोड आपल्या मोबाईलवरील वॉट्सअपच्या साह्याने स्कॅन केल्यावर तुम्हाला या ब्राऊजरमधूनही वॉट्सअप वापरता येईल. यासाठी सर्वात आधी वॉट्सअपचे अपडेटेड व्हर्जन तुमच्या मोबाईलवर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर इंटरनेट सुविधाही सुरू असली पाहिजे.
सध्या तरी ही सुविधा ‘आयओएस’ म्हणजे ‘अॅपल’धारकांसाठी उपलब्ध नाही. मात्र, अॅंड्राईड, ब्लॅकबेरी आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे मोबाईलधारक या सुविधाचा वापर करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Web version of whatsapp launched
First published on: 22-01-2015 at 02:34 IST