गेल्या तीन वर्षांमध्ये संपूर्ण जगाने करोनासारख्या साथीच्या रोगाची लाट पाहिली. या रोगापासून बचावासाठी जगभरातील सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले. लोकांना स्वतःचं घर सोडून कुठेही जाता येत नव्हतं. त्याचबरोबर या रोगाने लाखो लोकांचा जीव घेतला. लाखो कुटुंबं रस्त्यावर आली. २०१९ पासून सुरू झालेला हा रोग आता कुठे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. परंतु हे शक्य झालं कारण संशोधक या रोगावर लस तयार करू शकले म्हणून. परंतु तुम्हाला वाटतं का, आता सगळं सुरळीत झालं आहे. किंवा इथून पुढे कधी असा रोग येणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की, आता जगाची अशा रोगापासून सुटका झाली आहे तर तुम्ही चूक करताय.

करोनाची लाट ओसरल्यानतंतर आणि यावर लस तयार झाल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाली आहे असं आपल्याला वाटत असलं तरी वैज्ञानिक पुढच्या संकटामुळे चिंतेत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुखांनी अलिकडेच केलेलं एक वक्तव्य जगाच्या चिंता वाढवणारं आहे, तसेच वैज्ञानिकांना अधिक सतर्क करणारं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी जगाला येणाऱ्या साथरोगासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. त्यांच्या मते हा रोग करोनापेक्षा महाभयंकर आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रायोरिटी डिसीज नावाने एक रोगांची यादी आहे. यामध्ये प्राणघातक साधीच्या रोगांचा समावेश आहे. या यादीत इबोला, सार्स आणि झिका यांसारख्या आपल्याला परिचित असलेल्या रोगांची नावं आहेत. त्यात आता डिसीज एक्स हे नाव समाविष्ट करण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू, आतापर्यंत ३ पिल्ल्यांचा मृत्यू; ‘हे’ कारण आलं समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या या आजाराची ओळख पटलेली नाही, म्हणून आरोग्य संघटनेनं या आजाराला एक्स असं नाव दिलं आहे. याची ओळख पटली नसली तरी यामुळे मानवांमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका आहे. डिसीज एक्स हा ज्या प्रकारचा रोग आहे ज्यावर लसी किंवा उपचारांचा अभाव दिसून येतो.