Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने ‘एअर स्ट्राईक’ करत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. या ‘एअर स्ट्राईक’मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीतील तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दहशतवाद्यांच्या ९ तळांना लक्ष्य करण्यात आलं. ऑपरेशन सिंदूर पार पाडल्यानंतर सकाळी १०.३० वाजता भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे या लष्करी मोहिमेची माहिती देणारी एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये लष्करी कारवाईची माहिती विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी सादर केली.
या दोघी वरिष्ठ महिला लष्करी अधिकारी आहेत. भारतीय लष्कराचे महिला नेतृत्वही तेवढेच सक्षम असल्याचा संदेश भारताने पाकिस्तानसह संपूर्ण जगाला दिला. या मोहिमेचे जाणीवपूर्वक निवडलेले नाव, त्या कारवाईची वेळ कशी ठरली, त्याचा संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिक्रियेशी काय संबंध आणि कारवाईची माहिती देताना भारताने दाखविलेली मुत्सद्देगिरी याचे नेमके विश्लेषण.