व्हॉट्सअॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस आणि मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक राजीव अग्रवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दोघांनी अचानक राजीनामा दिल्याने व्हॉट्सअॅपचे सार्वजनिक धोरण संचालक शिवनाथ ठुकराल यांची आता मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, दोघांच्याही राजीनाम्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नुकताच मेटाकडून जगभरातील ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. मेटाकडून करण्यात आलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कर्मचारी कपात होती. या महिन्याच्या सुरुवातीला मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

हेही वाचा – चीनला मागे टाकत भारत सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश कधी होणार? संयक्त राष्ट्राने दिलं उत्तर, म्हणाले…

अभिजित बोस राजीनाम्यानंतर व्हॉट्सअॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आले असून त्यांनी बोस यांचे आभान मानले आहे. ”व्हॉट्सअॅप इंडियाचे पहिले प्रमुख अभिजित बोस यांनी दिलेल्या सेवेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या धोरणांमुळे देशभरातील करोडो लोकांना फायदा झाला आहे. लवकरच या पदावर नवीन नियुक्ती करण्यात येईल”, असे या निवेदनातून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – Shraddha Murder Case: ‘डेक्सटर’ वेब सीरिज पाहून केले प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे; पण या ‘Dexter’ ची कथा आहे तरी काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेले शिवनाथ ठुकराल हे माजी पत्रकार आहेत. २०१७ मध्ये त्यांची सार्वजनिक धोरण टीमचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते आता मेटाचे (फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप ) साार्वजनिक धोरण संचालक म्हणून काम पाहतील.