Who was gangster Chandan Mishra? : बिहारची राजधानी पाटणामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. येथील एका रुग्णालयात गुन्हेगारांच्या ५ जणांच्या टोळीने हातात शस्त्र घेऊन एका रुग्णालयात जाऊन एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. गुरूवारी एका खाजगी रुग्णालयात घडलेल्या या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

हत्या करण्यात आली त्याचे नाव चंदन मिश्रा असे होते. तो एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. दोन टोळ्यांमधील वादातून ही हत्या झाली असल्याचा पोलिसांना संशय आहे.

२०११ मध्ये व्यापारी राजेंद्र केशरी यांच्या हत्या प्रकरणात चंदन याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र पाटणा उच्च न्यायालायाने १२ फेब्रुवारी २०२० रोजी ही शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलली.

चंदन मिश्रा हा बेऊर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत होता, पण नुकतेच त्याला वैद्यकीय उपचारासाठी १५ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले होते. त्याची ही पॅरोल १८ जुलै रोजी संपणार होती. पण त्याआधीच त्याच्या शत्रूंनी त्याला गाठले.

पाच जणांचे एक टोळके गुरुवारी पारस रुग्णालयात दाखल झाले, हे रुग्णालय शास्त्री नगर पोलीस ठाम्याच्या हद्दीत येते. हे पाचही जम चंदन याच्या खाजगी खोलीत घुसले आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर तेथून पसार झाले. दिवसाढवळ्या हा हल्ला झाल्याने या रुग्णालयात भीतीचे सावट पसरले.

“चंदन मिश्रा हा पॅरोलवर होता आणि त्याला उपचारासाठी पारस रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर रुग्णालयाच्या आतमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या,” असे पाटणाचे एसपी कार्तिके के शर्मा यांनी सांगितले, तसेच त्याच्या खोलीतून गोळ्यांचे शेल्स जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की प्राथमिक तपासात ही हत्या टोळी युद्धाशी संबंधित असल्याचे दिसून येते. “प्रथमदर्शनी असे दिसून येते की ही टार्गेट किलिंगची घटना असून रेकी केल्यानंतर ही घटना घडवून आणली,” असे आयजी राणा म्हणाले.

कोण होता चंदन मिश्रा?

चंदन याला चंगन सिंग म्हणून देखील ओळखले जात असे आणि त्याच्याविरोधात २० गुन्हेगारी खटले दाखल होते, ज्यामद्ये हत्या आणि बँक, दागिन्याची दुकानांवर दरोड्यांच्या गुन्ह्यांचा देखील समावेश होता. तो आंतरराज्यीय सोने लुटारू संतोष सिंगचा जवळचा सहकारी मानला जात असे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंदनला यापूर्वी २०१४ मध्ये स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ने कोलकाता येथून अटक केली होती आणि त्याला बक्सर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते, नंतर भागलपूर आणि नंतर बेऊर जेलमध्ये हलवण्यात आले होते.