पीटीआय, भोपाळ
मध्य प्रदेशातील भाजप सरकारने भ्रष्टाचाराचे आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचा आरोप काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी नरेला येथील जाहीर प्रचारसभेत सोमवारी केला.मध्य प्रदेशातील भाजप सरकारने केलेल्या गैरव्यवहारांची ईडी, सीबीआय किंवा प्राप्तिकर चौकशी का केली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
भाजपच्या कथित भ्रष्टाचाराच्या पुष्टय़र्थ राहुल यांनी एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने कोटय़वधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आणि शिवराज चौहान सरकारच्या गैरव्यवहारांच्या कथित चित्रफितींचा हवाला दिला. भाजपचे तोमर नावाचे मंत्री आहेत. त्यांचा एका ध्वनिचित्रफीतीत १० कोटी इकडे पाठवा, २० कोटी तिकडे द्या आणि १०० कोटी बँकेच्या खात्यात जमा करा, असे म्हणत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.