पहिले महायुद्ध (World War I) हे युरोपात झालेले एक वैश्विक युद्ध होते जे २८ जुलै १९१४ ते ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले. या युद्धाला सर्व युद्धांना समाप्त करणारे युद्ध देखील म्हटले जाते. हे युद्ध इतिहासातील सर्वात प्राणघातक संघर्षांपैकी एक मानले जाते, कारण या युद्धात लाखो लोकांनी आपला जीव गमावला. तर युद्धानंतर १९१८ मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लूच्या साथीमुळे जगभरात १७ ते १०० दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या युद्धात जवळपास १० लाख भारतीय सैन्यातील सैनिकांनी सहभाग घेतला होता. त्याकाळी या सैन्याला ‘ब्रिटिश भारतीय सेना’ असे म्हटले जायचे. यातील ६२ हजार सैनिक शहिद झाले तर ६७ हजार सैनिक जखमी झाले होते. युद्धादरम्यान एकूण ७४ हजार १८७ सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पहिल्या महायुद्धात भारतीय सैन्याने जर्मन साम्राज्याविरुद्ध जर्मन पूर्व आफ्रिकेत आणि पश्चिम आघाडीवर लढा दिला. या युद्धात व्हिक्टोरिया क्रॉस मिळवणारे खुदादाद खान हे पहिले भारतीय ठरले.

Russia Ukraine War: खनिज तेलाचे भाव १०० डॉलर प्रति बैरल पार

पहिल्या महायुद्धाची कारणे (Causes of World War I)

  • २८ जून १९१४ साली बोस्नियाच्या सर्ब युगोस्लाव्ह राष्ट्रवादी गॅव्ह्रिलो प्रिन्सिपने ऑस्ट्रो-हंगेरियन वारस आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड यांची साराजेव्हो येथे हत्या केली. त्यानंतर ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाविरुद्ध युद्ध घोषित केले.
  • युद्धात सहभागी झालेल्या केंद्रीय शक्तींमध्ये ऑस्ट्रिया-हंगेरी, बल्गेरिया, जर्मनी आणि ऑट्टोमन साम्राज्य म्हणजेच आताचे तुर्की यांचा समावेश होता.
  • मित्र राष्ट्रांमध्ये बेल्जियम, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, ग्रीस, इटली, मॉन्टेनेग्रो, पोर्तुगाल, रोमानिया, रशिया, सर्बिया आणि अमेरिका यांचा समावेश होता.
  • जर्मन पाणबुडी अमेरिकन व्यावसायिक शिपिंगला बुडवणार तोच अमेरिकेने तटस्थता घोषित केली.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why the first world war happend the role of indian army in this war pvp
First published on: 24-02-2022 at 11:49 IST