पत्नी पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पतीने पत्नीशी जे वर्तन केलं ते ऐकून कुणालाही चिडच येईल. तसंच महाभारताचीही आठवण येईल. कारण जुगारात हा माणूस सगळं काही हरला अखेर त्याने त्याच्या पत्नीलाही जुगाराच्या पणाला लावलं. मात्र तो डावही त्याला जिंकता आला नाही. त्याने आपल्या पत्नीला दिल्लीत तसंच सोडून दिलं आणि घरी निघून आला. ही घटना पीडित महिलेच्या भावाला कळली तेव्हा तो दिल्लीला गेला आणि त्याने बहिणीला सोडवलं.

उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधलं हे प्रकरण आहे. या महिलेला सोडवून आणण्यात आलं तेव्हाही तिच्या अडचणी संपल्या नाहीत. कारण तिला तिच्या भावाने जेव्हा पतीच्या घरी पाठवलं तेव्हा या महिलेच्या दिराने तिच्याशी गैरवर्तन केलं. या प्रकरणी आता या पीडित महिलेने पती आणि दिराविरोधात पोलिसात धाव घेतली आहे. सध्या ही पीडिता तिच्या माहेरीच राहते आहे.

नेमकी काय घडली घटना?

डिडौली कोतवाली भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या मुलीचा(पीडिता) विवाह तीन वर्षांपूर्वी एका युवकाशी करुन दिला होता. महिलेने आता हा आरोपही केला आहे की लग्नाच्या वेळी तिचा पती आणि सासरच्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला. तसंच शारिरीक छळही केला. पीडित महिलेने पोलिसांना हे सांगितलं की तिच्या पतीला जुगार खेळण्याची सवय आहे. तो रोजच जुगार खेळण्यासाठी पैसे मागतो. महिलेने हेदेखील सांगितलं की जुगार खेळण्यासाठी तो आपल्याला दिल्लीला घेऊन गेला. तिथे पैसे हरल्यावर त्याने मलाही त्या डावावर पणाला लावलं. पण तो हरला. त्यानंतर मला तसंच टाकून तो घरी निघून आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित महिलेने काय सांगितलं?

माझ्या भावाला जेव्हा हा सगळा प्रकार कळला तेव्हा त्याने माझी सुटका केली. तसंच महिलेने हेदेखील सांगितलं की माझ्या दिरानेही माझा शारिरीक छळ केला आहे. मी घरात एकटी असताना त्याने माझी छेड काढली. तेव्हापासून मी माहेरीच निघून आले आहे असंही या महिलेने सांगितलं. आता पोलिसांनी या महिलेच्या तक्रारीनंतर हुंड्यासाठी छळ करणे, छेडछाड, मारहाण या गुन्ह्यांच्या कलमांतंर्गत गुन्हा दाखल केला आहे. Live Hindusthan ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.