‘विकिलिक्स’चा संस्थापक ज्युलियन असांज याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यास लंडन उच्च न्यायालयाने शुक्रवारी मंजुरी दिली. मात्र या निर्णयाला असांजे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो.

अमेरिकेतील फौजदारी न्याययंत्रणेला सामोरे जाण्यास असांजचे मानसिक आरोग्य खूपच नाजूक असल्याने त्याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करता येणार नाही, असा निकाल लंडनमधील कनिष्ठ न्यायालयाने दिला होता. तो लंडन उच्च न्यायालयाने फिरवला. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाचे दरवाजे खुले झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘विकिलिक्स’ने दशकभरापूर्वी प्रकाशित केलेल्या गुप्त लष्करी कागदपत्रांप्रकरणी अमेरिकेने असांज याच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला आहे. त्यासाठी त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी अमेरिकेने ब्रिटनकडे केली होती. त्याविरोधात असांजच्या वतीने जिल्हा न्यायालयात दाद मागण्यात आली होती. असांजला अमेरिकेतील तुरुंगात ठेवल्यास तो आत्महत्या करू शकतो, असे नमूद करीत लंडन येथील जिल्हा न्यायाधीशांनी आरोग्याच्या कारणास्तव त्याच्या प्रत्यार्पणाविरोधात निकाल दिला होता. असांजचे मानसिक आरोग्य चांगले नसल्यामुळे त्याला अमेरिकेतील तुरुंगात ठेवणे असुरक्षित असल्याच्या न्यायाधीशांच्या निकालाला अमेरिकेच्या वतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.