योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवणार; भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची घोषणा

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी यूपी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

yogi-azad
(संग्रहित छायाचित्र)

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी यूपी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, त्याच जागेवरून आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यापूर्वी २०१९ मध्ये वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, त्यांनी माघार घेतली होती.

“मी पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला पण त्यावेळी माझ्याकडे माझा पक्ष नव्हता, त्यामुळे मी तसे केले नाही. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मला विरोधी मतांचे विभाजन करण्याऐवजी मी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणे चांगले राहील, असं सांगितलं,” असं चंद्रशेखर आझाद एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

तसेच भीम आर्मी हा त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशमधील प्रत्येक जागा लढवेल, असंही त्यांनी सांगितलं. निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “हे निर्णय पक्षाच्या मंडळाचे आहेत. तेथे असलेली समिती निर्णय घेईल. जर तुम्ही माझ्या मनापासून विचाराल तर मी सांगेन की लोकशाही आहे, मला माझ्या पक्षात माझे मत मांडण्याचा अधिकार आहे. जर पक्षाने मला संधी दिली तर मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत त्या निवडणूक लढवीन. मी त्याच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे.”

“मी मुख्यमंत्री योगी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे, कारण त्यांनी गेल्या साडेचार वर्षात उत्तर प्रदेशच्या जनतेला खूप त्रास दिला आहे. मी अशा निर्दयी मुख्यमंत्र्याच्या विरोधात निवडणूक लढवणार, त्यांना सभागृहात येऊ देणार नाही, असा माझा विश्वास आहे. माझ्यासाठी विधानसभेत जाणे आवश्यक नाही, पण योगींना थांबवणे महत्त्वाचे आहे. सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची पक्षाची तयारी सुरू आहे,” असंही आझाद म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Will contest against against cm yogi in up election says dalit leader chandrashekhar azad hrc

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या