२० वर्षांहून अधिक काळ दृष्टिहिन असलेल्या एका ७० वर्षीय वृद्धेची घरात पडल्याने दृष्टी परतल्याची आश्चर्यकारक घटना फ्लोरिडामध्ये घडली. आपल्याच घरात पडलेल्या या वृद्ध महिलेच्या डोक्याला मार लागला होता. १९९३ सालच्या एका कार दुर्घटनेत मेरी अन फ्रांकोने दृष्टी गमावली. जवळजवळ २० वर्षांनंतर तिला आणखी एका दुर्घटनेचा सामना करावा लागला. परंतु, यावेळीची दुर्घटना तिच्यासाठी वरदान ठरली. या दुर्घटनेत मेरीची दृष्टी परतली. डॉक्टरांच्या मते हा एक चमत्कार असून, मेरीची दृष्टी कशामुळे परतली हे शोधण्याचा डॉक्टर प्रयत्न करत आहेत.
आपण शयनगृहात होतो आणि दरवाज्याजवळ जाताना पाय घसरून पडल्याने आपल्या डोक्याच्या मागच्या बाजूस मार लागल्याचे मेरीने इंग्लिश वृत्तपत्र इंडिपेंडेंटशी संवाद साधताना सांगितले. २०१५ साली घडलेल्या या घटनेनंतर मेरी हिंडण्या-फिरण्यास परावलंबी झाली. तिच्या मानेवर चार तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी देण्यात आलेल्या गुंगीच्या औषधाचा परिणाम उतरल्यावर आपल्या डोळ्यांची दृष्टी परत आल्याचे तिला जाणवले. परंतु, पहिल्याच खेपेस मेरीला आपली दृष्टी परतल्याचे समजले नाही. नंतर तिला आणखी औषधे देण्यात आली. पुढील सकाळी रुग्णालयाच्या खिडकीतून ती झाडं आणि पांढरी घरं बघू शकत होती. मेरीची दृष्टी प्रभावित होईल याची आशा मी केली नव्हती, असे ‘एबीसी न्यूज’शी संवाद साधताना मेरीचे ऑपरेशन करणारे न्युरोसर्जन डॉय जॉन अफशर म्हणाले. त्याचबरोबर हा एक चमत्कार असल्याचेदेखील ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman falls and regains sight after 20 years of blindness
First published on: 09-05-2016 at 17:07 IST