करोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगभरामध्ये खळबळ उडवून दिलीय. त्यामुळेच अनेक देशांनी परदेशी प्रवाशांसाठीचे निर्बंध कठोर केले आहेत. करोना चाचण्या, आयसोलेशन आणि विमानतळावरच करोना चाचण्यांसाठी विशेष सोय अनिवार्य करण्यात आल्या. असं असतानाच अमेरिकेमध्ये एका विमानामधून उड्डाण घेतल्यानंतर महिला करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळल्यानंतर तिला विमानाच्या वॉशरुममध्ये पाच तास आयसोलेट करण्यात आलं.

‘द ट्रिब्यून’ने दिलेल्या वृत्तानुसार शिकागोवरुन आइसलॅण्डला जाणाऱ्या विमानाने प्रवास करणाऱ्या महिलेची करोना चाचणी सकारात्कम आल्याची माहिती मिळाल्यानंतर या महिलेल्या विमानातच क्वारंटाइन करण्यात आलं. या महिलेला विमानाच्या वॉशरुममध्ये पाच तासांसाठी क्वारंटाइन करण्यात आलं होतं.

डब्ल्यूएबीसी टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार ही महिला मिशिगनमध्ये शिक्षिका आहे. या महिलेचं नाव मारिसा फोटियो असं आहे. १९ डिसेंबर रोजी विमानामधून प्रवास करताना या महिलेला गळ्यामध्ये खवखव जाणवू लागली. तिने खासगी करोना चाचणी किटच्या मदतीने वॉशरुममध्ये जाऊन चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. हजारो फुटांवर विमान उड्डाण करत असतानाच त्यांना आपल्याला करोना झाल्याचं लक्षात आलं अन् त्यांना त्याचा मोठा धक्का बसला. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं ते विमानाच्या वॉशरुममध्ये.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: ‘या’ देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही; यादीतील शेवटचे दोन देश पाहून आश्चर्य वाटेल

फोटियो यांनी सीएनएन न्यूजला दिलेल्या माहितीनुसार विमानतळावर त्यांनी दोन पीसीआर चाचण्या केल्या होत्या. तसेच पाच रॅपिड कोव्हिड टेस्टही केल्या होत्या. सर्व चाचण्यांचे निकाल नाकारात्मक आले होते. मात्र त्या विमानामध्ये बसल्या आणि दीड तासांच्या प्रवासानंतर घशामध्ये खवखव जाणवू लागली. त्यांनी पुन्हा एकदा विमानातच रॅपिड टेस्ट केली असता त्याचा निकाल पॉझिटिव्ह आला,

फोटियो सांगतात, “विमानामध्ये बोर्डिंग केल्यानंतर मला त्रास होऊ लगाला. माझ्या डोक्यात फार विचार सुरु होते. मी स्वत:ला समजावलं आणि केवळ एकदा चाचणी करुन बघूया म्हटलं. सर्व ठिकं असणार असा विचार करुन मी चाचणी करण्यासाठी वॉशरुममध्ये गेली. मात्र चाचणीचा निकाल पाहून मला धक्का बसला. मी करोना पॉझिटिव्ह होते.”

फोटियो यांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यांनी बूस्टर शॉर्टही घेतला होता. फोटियो यांना कामानिमित्त अनेकांना भेटावं लागत असल्याने त्या दर दोन आठवड्यांनी करोनाची चाचणी करायच्या.