आईच्या प्रियकराचा मुलीवर बलात्कार; पीडितेचं बाळ घरीच जन्माला घालण्यास आईनं केली मदत, आरोपींना बेड्या

जेव्हा पीडितेला प्रसुती वेदना होऊ लागल्या तेव्हा महिलेने तिला दवाख्यान्यात नेण्याऐवजी घरातील बाथरुममध्येच तिची प्रसुती केली.

चेन्नईत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकरालाच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची परवानगी दिल्याची घटना घडली आहे. बलात्कारानंतर पीडिता गरोदर राहिली होती. लोकांपासून ही गोष्ट लपवून ठेवण्यासाठी पीडितेने बाळाला घरातच जन्म दिला. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेची आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

प्रियकरासोबतच स्वत:च्या मुलीचे लावले लग्न

३८ वर्षीय महिला चेन्नईत मजूर म्हणून काम करत होती. तिची मुलगी ११वीत शिकत होती. महिलेचे ५० वर्षीय पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. या प्रियकरानेच महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. काही वेळाने महिलेला हा प्रकार लक्षात आला. मात्र, प्रियकराविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याऐवजी तिने आपल्या मुलीचे शिक्षण बंद केले आणि आपल्या प्रियकरासोबत मुलीचे लग्न लावून दिले. शेजाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून महिलेने मुलीला आपल्या घरातच ठेवले.

आजारी बाळाला दखान्यात नेल्यानंतर प्रकार उघडकीस

१ मे रोजी जेव्हा पीडितेला प्रसुती वेदना होऊ लागल्या तेव्हा महिलेने तिला दवाख्यान्यात नेण्याऐवजी घरातील बाथरुममध्येच तिची प्रसुती केली. मात्र, जेव्हा मूल आजारी पडले आणि त्याला उपचारासाठी प्राथमिक केंद्रात न्यावे लागले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मुलाच्या जन्माची नोंद आणि बाळाची विचारणा केली. तेव्हा महिलेने आपल्या मुलीचे आधारकार्ड कर्मचाऱ्यांना दाखवले.

आईला आणि तिच्या प्रियकराला अटक

आधारकार्डवर जेव्हा पीडितेचे वय तपासले तेव्हा ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती बालकल्याण समितीला दिली. चैन्नई पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत महिला आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman lover rape minor daughter deliver baby home in chennai dpj

Next Story
तमिळनाडूच्या शिक्षणमंत्र्यांची जीभ घसरली; म्हणाले, “हिंदी भाषिक आमच्याकडे…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी