शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या मुलीच्या आईवर रुग्णालयातील कर्मचाऱयांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना होशंगाबादमध्ये घडली. याप्रकरणी पोलीसांकडे गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक माझी आणि आदित्य अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनाही पोलीसांनी अटक केलीये.
शनिवारी रात्री रुग्णालयातील स्वच्छतागृहातून बाहेर आल्यानंतर दीपक आणि आदित्य या दोघांनी बळजबरीने संबंधित महिलेला जवळच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये नेले. तिथे तिच्यावर या दोघांनी बलात्कार केला आणि घडलेली घटना कोणालाही न सांगण्याची धमकी तिला दिली. संबंधित महिलेने स्वतःच्या नवऱयाला ही घटना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर पोलीसांनी तातडीने कार्यवाही करीत दोन्ही आरोपींना अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman raped by hospital staffers two held
First published on: 21-10-2013 at 01:19 IST