हास्य हे प्रभावी औषध आहे, ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो असतो आनंदी, उत्साही आणि प्रेमळही! म्हणूनच रोजच्या जगण्यातल्या ताण-तणावांवर मात करण्यासाठी हास्याचं टॉनिक घ्यायलाच हवं. आज ३ मे जागतिक हास्य दिन. हास्य ही मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी आहे. ज्याला मनमोकळे, खळखळून हसता येते तो माणूस सुदैवी आहे. हसणार्या चेहर्याभोवती मित्रमैत्रिणींची गर्दी होते. एक वेगळाच प्रभाव समोरील व्यक्तीवर पडत असतो. शिवाय हसतमुख चेहर्याच्या व्यक्ती अनेक कठीण प्रसंगांवरही सहज मात करतात. हास्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हा घटक आपण जेवढा विकसित केला तेवढे आपले जीवन सुखी आणि आनंदी होत असते.
हास्य ही मूलत: जागतिक भाषा आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्यात तुम्ही गेला तरी या भाषेने तुम्ही इतरांसोबत संवाद साधू शकता. जगातील सर्व माणसे आनंदाची स्थिती व्यक्त करण्यासाठी याच भाषेचा वापर करतात. स्मित हास्य, खळखळून हसणं, पहाडी हास्य असे हास्यांचे विविध प्रकार असले तरी आनंद हाच त्यामागील भाव असतो. कुत्सित हास्य तेवढे प्रकर्षाने टाळावे. जगातील कोणत्याही दोन हसणार्या व्यक्तींमध्ये सहज मैत्री होऊ शकते. मग त्या व्यक्ती कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या असोत. कारण, हास्य हा सर्वांचा समान धर्म आहे. हास्य हे जगातील सर्वांशी मैत्री करून देणारे प्रभावी आनंदास्त्र आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2015 रोजी प्रकाशित
जागतिक हास्य दिन: हसा आणि हसवत राहा!
हास्य हे प्रभावी औषध आहे, ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो असतो आनंदी, उत्साही आणि प्रेमळही!

First published on: 03-05-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World laughter day