गुंदळूपेते (कर्नाटक) : ‘‘अभिव्यक्तीचे इतर सर्व मंच बंद असल्याने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाकडे ‘भारत जोडो यात्रा’ हा एकमेव पर्याय शिल्लक आहे,’’ असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ तमिळनाडूतील गुडालूर येथून कर्नाटकात चामराजनगर जिल्ह्यात दाखल झाली.

हेही वाचा >>> खरगे विरुद्ध थरूर लढत; काँग्रेस अध्यक्षपदासाठी दोघांचेही उमेदवारी अर्ज दाखल

हेही वाचा >>> मुंबई-गांधीनगर ‘वंदे भारत’ आजपासून; शहरेच भारताचे भविष्य घडवतील : पंतप्रधान मोदी

येथे झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी म्हणाले, की लोकशाहीत विविध संस्था आहेत. प्रसारमाध्यमे व संसदही आहेत. पण हे सर्व मार्ग विरोधकांसाठी बंद करण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमे आमचे ऐकत नाहीत. त्यावर संपूर्ण सरकारी नियंत्रण आहे. संसदेत आमचा आवाद बंद केला जातो. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या विधानसभांची कोंडी केली जाते. सर्व विरोधक हैराण आहेत.  ‘भारत जोडो यात्रा’ हाच पर्याय उरला आहे.