देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज रविवारी संपली. दोनापौला इथल्या निवासस्थानी रविवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पर्रिकर यांच्या निधनामुळे देशाने प्रामाणिक, मनमिळाऊ आणि लोकसेवेसाठी समर्पित असलेला नेता गमावल्याची भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. ऑनस्क्रीन पर्रिकर साकारणारे अभिनेते योगश सोमण यांनीही पर्रिकरांना श्रद्धांजली वाहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोमण यांनी पर्रिकरांच्या काही आठवणीसुद्धा सांगितल्या. ‘पहिल्याच भेटीत मला पर्रिकरांचा साधेपणा भावला. राजकारणी असले तरी त्यांना साहित्यात फार रुची होती. पु. ल. देशपांडेंच्या साहित्यावर आम्ही चर्चा केली होती. शेवटच्या श्वासापर्यंत मी देशाची आणि गोव्याची सेवा करणार असं ते म्हणाले होते. त्यांच्या शब्दाला ते शेवटपर्यंत जागले,’ असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogesh soman sharing memories of manohar parrikar
First published on: 18-03-2019 at 12:50 IST