उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ (Mood of The Nation 2020) सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. योगी आदित्यनाथ यांना एकूण २४ टक्के मतं मिळाली आहेत. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेच ही मतं सहा टक्क्यांनी वाढली आहेत. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असतानाही योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर लोकांनी समाधान व्यक्त केल्याचं दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- मोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली? २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…

सर्वेक्षणानुसार, पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री हे भाजपा आणि काँग्रेसची सत्ता नसणाऱ्या राज्यांचे आहेत. गेल्या तीन सर्वेक्षणात सलग पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना नऊ टक्के मतं मिळाली आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ टक्के मतं मिळाले असून ते दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ११ मतांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात टक्के मतांसहित सातव्या क्रमांकावर आहेत.

आणखी वाचा- चीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का? सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर

नरेंद्र मोदी सर्वोत्कृष्ट पंतप्रधान
दुसरीकडे सर्वेक्षणात नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान ठरले आहेत. ४४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असल्याचं मत नोंदवलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर अटलबिहारी वाजपेयी यांचा समावेश असून त्यांना १४ टक्के मतं मिळाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर १२ टक्क्यांसहित इंदिरा गांधी आहेत. जवाहरलाल नेहरु आणि मनमोहन सिंग यांना प्रत्येकी पाच टक्के मतं मिळाली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogi adityanath is best performing cm in india for third time in row in mood of the nation poll sgy
First published on: 08-08-2020 at 08:10 IST