scorecardresearch

अयोध्येत तुम्ही राम मंदिर बांधा, आम्ही बाबरी मशीद बांधतो – फरहान आझमी

“उद्धव ठाकरे सात मार्च रोजी अयोध्येला जाणार असतील तर, मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला गेले तर, आम्ही सुद्धा मशीद बांधण्यासाठी अयोध्येला जाऊ असे फरहान आझमी यांनी म्हटले आहे. फरहान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. “उद्धव ठाकरे सात मार्च रोजी अयोध्येला जाणार असतील तर, मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन. ते राम मंदिर बांधतील, आम्ही बाबरी मशीद बांधू” असे फरहान आझमी म्हणाले.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाच्यावेळी फरहान आझमी यांनी हे वक्तव्य केले. सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्येचा दौरा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यामुळे मुस्लिम समाजामध्ये अस्वस्थतता असल्याचे फरहान आझमी म्हणाले.

आणखी वाचा – ठरलं! उद्धव ठाकरे ‘या’ दिवशी जाणार अयोध्येत

उद्धव ठाकरे यांच्या नियोजित कार्यक्रमात कुठलाही बदल होणार नाही असे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितले. निवडणुकीआधीच उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला होता. फरहान आझमी जे काही म्हणाले, तो त्यांचा विचार आहे असे सामंत म्हणाले.

 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: You make ram temple at ayodhya we will make babri masjid farhan azmi dmp

ताज्या बातम्या