चालत्या बसमध्ये वाहक, त्याचा साथीदार आणि अन्य एक प्रवासी या तिघांनी आई व मुलीचा विनयभंग करून त्यांना गाडीतून ढकलून देण्याचा अमानुष प्रकार पंजाबच्या मोगा जिल्हात उघडकीस आल्यानंतर याच जिल्ह्यातून आणखी एक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे.
पंजाबमध्ये बसमधून ढकलल्याने मुलीचा मृत्यू, आई जखमी
मैत्रिणीचा पती आणि त्याच्या मित्रांनी एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. २९ आणि ३० एप्रिल रोजी मोगा येथील मार्ही मुस्तफा गावातील एका घरात डांबून आपल्या मैत्रिणीचा पती आणि त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा दावा पीडितेने केला आहे. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत पीडितेच्या मैत्रिणीच्या पती आणि इतर मित्रांवर गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू केली आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री ती आपल्या प्रियकरासोबत आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले होती. दोघांनी रात्रभर तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, मैत्रिणीचा पती आपल्या सात मित्रांसोबत रात्री दारू पिऊन घरी आला आणि पीडितेच्या प्रियकराला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर जबरदस्ती एका खोलीत नेऊन तरुणीवर बलात्कार करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young woman alleges gang rape by her friends husband and his friends
First published on: 01-05-2015 at 12:01 IST