नेत्यांच्या नातेवाईकांची दादागिरी तुम्ही अनेकदा पाहिली असेल. माझे काका आमदार आहेत किंवा मामा खासदार आहेत, असंही तुम्ही ऐकले असेल. राजकारणी, मंत्र्यांच्या नातेवाईकांना पोलिसांसमोर अनेकदा धमकावण्याचे हे सर्वात मोठे हत्यार असते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मंत्र्याचा पुतण्या असल्याचे भासवत एक तरुण पोलिसांना नोकर म्हणून बोलावतो आणि शिवीगाळ करतो.

“आम्ही सरकार आणि तुम्ही नोकर”:

‘सरकार आमचे आणि आम्ही सरकार. इथं महेंद्रसिंग सिसोदिया यांचे ते पुतणे आहेत. तुम्ही बोलवा, इथे टीआय कोण आहे? हो बोलवा इथे. सरकार आमचे आहे आणि तुम्ही आमचे नोकर आहात.’ स्वतःला पंचायत मंत्र्याचा पुतण्या म्हणणाऱ्या या व्यक्तीने डीजे बंद करायला सांगणाऱ्या पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

झालं असं की मध्य प्रदेशातील राजगडमध्ये एका लग्न समारंभात रात्री उशिरापर्यंत डीजे वाजत होता. उदयराज सिंह नावाच्या तरुणाने त्याला रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांना धमकावले, गैरवर्तन केले, अपशब्द वापरत शिवीगाळ केली आणि नंतर स्वत:ला पंचायत मंत्र्यांचा पुतण्या असल्याचं सांगितलं. धमकी आणि तिथल्या वातावरणामुळे पोलीस तेथून परतले मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मंत्री म्हणाले – तरुण माझा पुतण्या नाही”:

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण एसपी आणि मंत्र्यांपर्यंत पोहोचले. वृत्तानुसार, मंत्री म्हणाले की, युवक त्यांचा पुतण्या नाही. पोलिसांनी तरुणांविरुद्ध एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची तयारी केली होती.  नंतर उदयराज सिंह नावाच्या या तरुणाला आपली चूक लक्षात आली आणि त्यांने मीडियासमोर माफी मागितली.

तरुणाने मागितली माफीः

पोलिसांना धमकी देणारा उदयराज सिंह म्हणाला की, “मी त्यांचा पुतण्या नाही, तो आमच्या भागाचा आमदार आहे. रागाच्या भरात मी खूप बोललो, त्याबद्दल मी माफी मागतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता पोलिसांनी उदयराज सिंह विरुद्ध कलम २९४, ३५५, ३५३, ५०६ आणि १८८ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच डीजे करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ध्वनी कायदा आणि १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.