वाघाच्या हल्ल्यात युवकाचा दिल्लीत मृत्यू

दिल्लीतील प्राणिसंग्रहालयात मंगळवारी भीषण दुर्घटना घडली. पांढऱ्या वाघाची छायाचित्रे काढण्यासाठी तटबंदीवर चढलेला एक युवक वाघाच्या पिंजऱ्यात असलेल्या खंदकात पडला.

दिल्लीतील प्राणिसंग्रहालयात मंगळवारी भीषण दुर्घटना घडली. पांढऱ्या वाघाची छायाचित्रे काढण्यासाठी तटबंदीवर चढलेला एक युवक वाघाच्या पिंजऱ्यात असलेल्या खंदकात पडला. त्यानंतर वाघाने त्याच्यावर केलेल्या हल्ल्यात या दुर्दैवी युवकाला आपला जीव गमवावा लागला. ऐन विशीत असलेला हा तरुण वाघाच्या पिंजऱ्यात नेमका कसा पडला याबाबत संभ्रम आहे. वाघाची छायाचित्रे काढण्यासाठी सदर युवकाने वाघाच्या पिंजऱ्याभोवती असलेल्या तटबंदीवर चढण्याचा प्रयत्न केला. आणि त्या वेळी पाय घसरून सदर युवक पिंजऱ्यात पडला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. पिंजऱ्यात पडलेल्या असाहाय्य युवकाला पाहिल्यानंतर वाघाने पहिले काही क्षण आक्रमक रूप धारण केले नव्हते. मात्र युवकाच्या बचावासाठी काही लोकांनी पिंजऱ्यावर दगडफेक सुरू केली आणि सुरक्षा रक्षकांनीही पिंजऱ्यावर जोरदार धडका मारण्यास प्रारंभ केला. त्यामुळे वाघ चवताळला आणि त्याने त्या युवकाची मान धरली आणि खेचत-खेचत त्याला अन्यत्र घेऊन गेला. सुरक्षा रक्षककांकडे वाघाला निद्रिस्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदुका नव्हत्या. त्यामुळे वाघ युवकाला फरफटत घेऊन जात असताना त्याला पाहण्यापलीकडे सुरक्षारक्षक काहीही करू शकले नाहीत.ही दुर्घटना अनेकांनी पाहिली तर काहींनी त्याचे चित्रीकरणही केले. यामध्ये मानेभोवती घट्ट पकड घेत युवकाला वाघाने ठार मारल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रत्यक्ष घटनेनंतर अनेक तास उलटूनही त्या युवकाचा मृतदेह बाहेर काढणे सुरक्षारक्षकांना शक्य झाले नव्हते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Youth mauled to death by white tiger at delhi zoo