अमेरिकेत टुल नदीकाठी रेड इंडियन आदिवासींच्या वसाहतीत गाडीतून जात असताना हेक्टर सेलेय (वय ३१) या तरुणाने आपल्याच आप्तांवर केलेल्या गोळीबारात त्याची आई, त्याचे दोन मामा आणि त्याच्या एका मुलीचा अंत ओढवला तर अटक टाळण्यासाठी त्याने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत पोलिसांनी केलेल्या कारवाईत हेक्टरचाही मृत्यू झाला.
हेक्टरने शनिवारी सायंकाळी हा गोळीबार केला आहे. गोळीबाराचे नेमके कारण मात्र कळू शकलेले नाही. त्याची एक मुलगी गोळीबारातून वाचली आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हेक्टरला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने अटक टाळण्यासाठी पोलिसांवर गोळीबार सुरू करताच पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हेक्टरचा मृत्यू ओढवला.
या वसाहतीत सुमारे ८०० आदिवासींची वस्ती आहे. बरेचसे आदिवासी सुसज्ज घरात परिवर्तित केलेल्या फिरत्या ट्रेलरमध्येच राहातात. सेलेय व त्याचे कुटुंबियही तसेच राहात होते. या नदीलगतच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेला ईगल माऊंटन कॅसिनो हा या आदिवासींच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत असून त्याद्वारे प्रत्येक कुटुंबास दरमहा ५०० डॉलर मिळतात. मात्र हे पैसे मुलांच्या शिक्षणाकडे वळविले जातात. हेक्टर हा या कॅसिनोचा व्यवस्थापक म्हणून काम पाहात असे. मात्र तो गेले कित्येक दिवस तणावग्रस्त परिस्थितीचा सामना करीत होता आणि नैराश्याने ग्रासला होता, असे समजते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2012 रोजी प्रकाशित
अमेरिकेत तरुणाचा आप्तांवर गोळीबार; ५ ठार
अमेरिकेत टुल नदीकाठी रेड इंडियन आदिवासींच्या वसाहतीत गाडीतून जात असताना हेक्टर सेलेय (वय ३१) या तरुणाने आपल्याच आप्तांवर केलेल्या गोळीबारात त्याची आई, त्याचे दोन मामा आणि त्याच्या एका मुलीचा अंत ओढवला तर अटक टाळण्यासाठी त्याने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत पोलिसांनी केलेल्या कारवाईत हेक्टरचाही मृत्यू झाला.

First published on: 11-12-2012 at 05:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth shoot out on relative in america 5 killed