Steve Chen On Instagram and YouTube Reels App : सध्याच्या काळात सोशल मीडियावर अनेकांचा अधिक वेळ इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा टिकटॉकवरील व्हिडीओ रील्स स्क्रोल करण्यात जातो. सकाळी ऑफिस, कॉलेजला पोहोचेपर्यंत आणि रात्री झोप लागेपर्यंत अनेकजण रील्स स्क्रोल करत असतात. खरं तर रील्स (Reels) बघण्याचा मोह अनेकांना असतो. मात्र, टिकटॉक व इन्स्टाग्रामवरचे रील्स मुलांसाठी धोकादायक असल्याचं स्पष्ट मत आता यु ट्यूबच्या को-फाउंडर यांनी मांडलं आहे.

युट्यूबचे सह-संस्थापक स्टीव्ह चेन यांनी या संदर्भातील इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं की, “टिकटॉक आणि इंस्टाग्रामवरील रील्स सारखे शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म मुलांमध्ये धोकादायक सवयी निर्माण करत आहेत. खरं तर या छोट्या-मोठ्या क्लिप्स अर्थपूर्ण असतात आणि त्या केवळ क्षणिक वापरासाठी किंवा निव्वळ मनोरंजन करण्यासाठी डिझाइन केलेल्या असतात, असं स्टीव्ह चेन यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

स्टीव्ह चेन यांनी शुक्रवारी स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलमध्ये इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा युट्यूब किंवा टिकटॉकवरील व्हिडीओ रील्स स्क्रोल संदर्भातील विषयांवर भाष्य केलं. यावेळी स्टीव्ह चेन यांनी सोशल मीडियावरील १५ मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या कंटेंटला प्राधान्य देणाऱ्या प्लॅटफॉर्मबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, “तरुण प्रेक्षकांना जास्त काळ आणि अधिक महत्त्वाच्या कंटेंटवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता गमावण्यास भाग पाडतात.”

मुलांच्या सुरक्षेसाठी जबाबदारी घेण्याचे आवाहन

२०१९ मध्ये तैवानला जाण्यापूर्वी युट्यूबचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम करणारे स्टीव्ह चेन यांनी वापरकर्त्यांच्या सहभाग आणि प्रत्यक्ष उपयुक्ततेमधील तणावावर सविस्तर भाष्य केलं. तसेच टिकटॉक मनोरंजन म्हणून यशस्वी होत असलं तरी ते तरुणांमध्ये एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करण्याचा कालावधी कमी करण्यास कारणीभूत ठरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी अलीकडेच शॉर्ट व्हिडीओ फीड्सचे वर्णन मुलांच्या मेंदूच्या विकासात समस्या आणणारे असं केलं आहे. तसेच ‘एनवाययू’चे प्राध्यापक जोनाथन हैड्ट यांनी बिझनेस इनसाइडरशी संवाद साधताना सोशल मीडिया अॅप्स पाश्चात्य जगात मुलांना गंभीरपणे नुकसान करत असल्याचं म्हटलं आहे.