लोकांना आपल्या आवडत्या रेस्तराँमधून खाद्यपदार्थ घरपोच मागवण्याची सेवा देणारे ‘झोमॅटो’ अॅप सध्या ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवण्यामध्ये  स्पर्धक कंपन्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. दरम्यान, आणखी एका कारणासाठी झोमॅटो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ते म्हणजे झोमॅटो इंडियाने केले ट्विट. झोमॅटो इंडियाच्या या ट्विटने ट्विटरवर एक ट्रेन्ड तयार केला आहे.

https://twitter.com/ZomatoIN/status/1146337153674174465

लोकांना रेस्तराँमधील गरमागरम जेवण घरपोच पोहोचवून बाहेरचं खायची सवय लावलेल्या झोमॅटोने चक्क ‘कधीतरी घरचंही जेवण खायला हवं,’ अशा आशयाचं हिंदी भाषेतून ट्विट केलं आहे. झोमॅटोकडून आपल्या मूळ स्वभावाच्या विरोधात ट्विट केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त करीत या ट्विटची मजाही घेतली आहे. झोमॅटोचे हे ट्विट इतर सेवा देणाऱ्या कंपन्यांनाही भलतेच भावले असून त्यांनी देखील झोमॅटो इंडियाच्या ट्विटची कॉपी करत आपल्या मूळ स्वभाविरोधात ट्विट केले आहे.

यामध्ये युट्यूब इंडिया, इक्झिगो, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आयएन, मोबोविक या कंपन्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर झोमॅटोच्या ट्विटची कॉपी केली आहे.

https://twitter.com/ZomatoIN/status/1148099136656412672

दरम्यान, या कंपन्यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना झोमॅटोने पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. यामध्ये ‘कधी कधी स्वतः चांगल्या ट्विटचा विचार करायला हवा’ असे म्हटले आहे.