News Flash

टिप्स : मोदी सरकारनं केलेल्या मदतीचा लाभ घेण्यासाठी काय करायचं?

देशातील ८ कोटी महिलांना याचा फायदा होणार

करोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांसाठी लॉकडाउन घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत ३ महिन्यांपर्यंत एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. देशातील ८ कोटी महिलांना याचा फायदा होणार आहे. पण ही पंतप्रधान उज्ज्वला योजना नेमकी आहे तरी काय? याचा फायदा कोणाला मिळतो? यासाठी काय करावं? यासारखे अनेक प्रश्न तुमच्या मनात भेडसावत असतील..याच सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूयात….

– १ मे २०१६ पासून केंद्र सरकारने ‘उज्ज्वला योजना’ सुरू केली. ‘उज्ज्वला’ ही गरिबी रेषेखालील कुटुंबांना, त्या कुटुंबातील महिलेच्या नावे सवलतीच्या दरात स्वैंपाकाचा गॅस मिळवून देणारी योजना आहे.

– या योजनेतून लाभधारकांना सिलिंडर, रेग्युलेटर आणि अन्य उपकरणांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाचा भार सरकार उचलते.

– याची एकूण किंमत ३२०० रुपये आहे. यात सरकार १६०० रुपये अनुदान देते. त्याचबरोबर तेल कंपन्या उर्वरित १६०० रुपये ग्राहकांना कर्ज स्वरूपात देतात. ग्राहकांना त्याची ईएमआयच्या माध्यमातून परतफेड करायची असते.

– १४.२ किलो सिलिंडर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पहिल्या सहा सिलिंडरमध्ये कोणताही ईएमआय भरावा लागत नाही. सातव्या सिलिंडरपासून ईएमआयची सुरूवात होते.

– पर्यावरण सुरक्षा साधणे आणि गृहिणींचा स्वैपाकात खर्च होणारा वेळ स्वैपाकाच्या गॅसमुळे आटोक्यात येऊन होणारी वेळेची बचत आणि त्यामुळे सक्षमीकरणाला मिळणारी चालना असे तीन प्रमुख मुद्दे या योजनेत येतात.

अर्ज कसा कराल –

बीपीएल कार्डधारक कोणतीही महिला उज्ज्वला योजनाचा लाभ घेऊ शकते.

नजीकच्या एलपीजी सेंटरमध्ये जाऊन अर्ज भरावा लागेल. तुम्हाला तेथे केवायसी फॉर्म भरावा लागेल.

अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, नाव, पत्ता, जन धन बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इ. आवश्यक आहे.

– पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या वेबसाइटवरून आपण PMUY चा अर्ज डाउनलोड करू शकता.

कागदपत्रे कोणती?
– अर्जदाराकडे बीपीएल रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
– आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– रेशनकार्डची प्रत
– राष्ट्रीय बँकेत बचत खाते असणे बंधनकारक आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 4:49 pm

Web Title: pradhan mantri ujjwala yojana how to apply pm ujjwala yojana nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महिन्याला मिळेल १० हजारांचं पेन्शन, जाणून घ्या सरकारची योजना
2 समजून घ्या सहजपणे : करोनाच्या किती होतात चाचण्या? खर्च किती येतो?
3 मोदी सरकारची खास स्कीम, दिवसाला फक्त रूपया भरा अन् मिळवा दोन लाखांचा फायदा
Just Now!
X