03 December 2020

News Flash

…म्हणून काकडी फ्रिजमध्ये ठेऊ नये आणि सालीसकटच खावी

आयुर्वेदातही काकडीला विशेष महत्त्व आहे

काकडी

कोशिंबीरीमधली सर्वात आवडती फळभाजी म्हणजे काकडी होय. काकडी ही शीतल, पित्तशामक आहे. त्याचप्रमाणे काकडीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे शरीरातील मूत्रप्रमाण वाढते म्हणून मुत्रविकारासाठी काकडी ही उपयुक्त असते. काकडीमध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशिअम, मीठ, मॅग्नेशिअम, गंधक, सिलिकॉन, ग्लोरीन, बम्लोरीन आणि तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात म्हणून आयुर्वेदातही काकडीला विशेष महत्त्व आहे.

काकडी फ्रिजमध्ये का ठेवू नये?

काकडी ही शीत गुणधर्माची असते, त्यामुळे तिच्या अतीसेवनानं खोकला, सर्दी होते. म्हणूनच ती फ्रिजमध्ये ठेवून अधिक थंड करू नये. यामुळे वरील त्रास तर वाढतोच पण त्याचबरोबर तिच्यामधले पोषणमुल्येही कमी होतात. म्हणून ती फ्रिजमध्ये न ठेवता बाहेर ठेवून सामान्य तापमानालाच खावी.

काकडी सालीसकट का खावी?

काकडीत विपुल प्रमाणात खनिजे आहेत. अनेक जण काकडीची साल काढून काकडी खातात; पण शक्यतो साल काढूच नये. कारण काकडीच्या सालीलगतच क्षार आणि जीवनसत्त्वे विपुल प्रमाणात असतात. साल काढल्यानं ती निघून जातात म्हणून ती सालीसकटच खावी.

नक्की वाचा >> घरी ‘या’ पाच गोष्टी असतील तर अ‍ॅसिडिटीवर मिळवता येईल सहज मात

काकडीचे फायदे

– आम्लपित्त, गॅसेस यांसारख्या विकारांवर काकडी फायदेशीर आहे, यामुळे पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो.

– शरीरावरील भाजलेल्या जखमेची आग होत असेल तर काकडीचा रस लावल्यास लवकर आराम पडतो.

– निद्रानाश ही समस्या भेडसावत असेल तर काकडीचे काप डोक्यावर ठेवून झोपल्यास झोप लवकर येते.

– भूक मंद झाली असेल तर काकडीचे काप करून पुदिना, काळे मीठ, लिंबू रस, मिरे व जिरेपूड घालून खावेत. यामुळे भूक चांगली लागते.

– काकडी ही पित्तशामक असल्याने अपचन, उलटी, मळमळ यांसारख्या त्रासावरही ती फायदेशीर ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 4:45 pm

Web Title: the reason why you should not store cucumbers in the fridge scsg 91
Next Stories
1 समजून घ्या सहजपणे: भारत आणि नेपाळमधील कालापानी वाद नेमका आहे तरी काय?
2 LIC च्या पॉलिसीमध्ये दिवसाला १५४ गुंतवा अन् मिळवा १९ लाख
3 जाणून घ्या: अ‍ॅसिडिटी कशामुळे होते?; अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी काय करता येईल?
Just Now!
X