Pune : दर्शना पवार हत्याकांड आणि पुण्यात भरदिवसा एका तरुणीवर कोयताने वार करण्याचा प्रयत्न या दोन्ही घटनेने पुण्यासह महाराष्ट्रभरात चिंतेचे वातावरण आहे. मुलीच्या सुरक्षिततेला घेऊन पोलिस सुद्धा तितकेच सतर्क आहे. दामिनी मार्शल टीमच्या मदतीने मुलींना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात पुणे शहर पोलिसांनी एक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये पुणे पोलिसानी एका मुलीचा आणि मार्शल टीमच्या एका महिला पोलिसचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ” या फोटोमध्ये एक नोकरी करणारी तरुणी आहे जी लोणावळ्यातून पुण्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली पण एक मुलगा तिचा पाठलाग करत असल्याचे तिला जाणवले. तिच्याकडे शिवाजीनगर येथील दामिनी मार्शलचा नंबर सेव्ह होता. तिने त्वरीत कॉल केला आणि दामिनी मार्शल टीमच्या पोलिसांनी तिला शिवाजीनगर रेल्वेस्टेशनवर संपर्क साधला आणि तिला प्रत्यक्षपणे भेटले.”

हेही वाचा : Desi Jugad : स्टॅपलर पिन्सपासून बनवली चक्क कार; आनंद महिंद्रांनी दिली नोकरीची ऑफर


पुढे ट्विटमध्ये लिहिले आहे, “तुमच्याकडे तुमच्या परिसरातील दामिनी मार्शलचा नंबर आहे का? पुण्यातील दामिनी मार्शलच्या सर्व नंबर्सचा फोटो शेअर करुन पुणे पोलिसांनी सेव्ह करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : Optical Illusions : तुम्हाला फोटोमध्ये बेडूक दिसतो का? पण हा बेडूक नाही; एकदा क्लिक करून पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@PuneCityPolice या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन पुणे शहर पोलिसांनी हे ट्वीट केले आहे. या ट्विटवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. युजर्सने पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. “या लिस्टमध्ये वाघोली येथील दामिनी मार्शलचा नंबर का नाही? असा जाब सुद्धा विचारला आहे.