मिथुन चक्रवर्ती यांना सिनेसृष्टीतील योगदानाबाबत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सिनेसृष्टीतील पुरस्कारांपैकी सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात कशी झाली? याचं स्वरुप काय असतं आपण जाणून घेऊ.

दादासाहेब फाळके पुरस्कार कुठल्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली?

दादासाहेब फाळके यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे जनक असं म्हटलं जातं. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने १९६९ मध्ये हा पुरस्कार भारत सरकारने देण्यास सुरुवात केली. हा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे देण्यात येतो. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या पुरस्काराचं वितरण केलं जातं. चित्रपटसृष्टीत असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत, तंत्रज्ञ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.

हे पण वाचा- Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव

दादासाहेब फाळके पुरस्कार पहिल्यांदा कुणाला मिळाला?

दादासाहेब फाळके पुरस्कार हा पहिल्यांदा देविका राणी यांना देण्यात आला. १९६९ ते २०२४ या ५५ वर्षांच्या कालावधीत ५५ कलावंतांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

पुरस्काराचं स्वरुप काय?

पुरस्काराचं स्वरुप १९६९ ते २०२४ या ५५ वर्षांच्या कालावधीत बदलत गेलं आहे हे आढळून येतं. पुरस्कार सुरु झाला तेव्हा ढाल, शाल आणि ११ हजार रुपये हे पुरस्काराचं स्वरुप होतं. त्यानंतर सुवर्णपदक, शाल आणि २० हजार रुपये हे पुरस्काराचं स्वरुप झालं. १९८२ पासून सुवर्णकमळ १ लाख रुपये आणि शाल असं पुरस्काराचं स्वरुप होतं. २००३ मध्ये पुरस्काराची रक्कम २ लाख रुपये करण्यात आली. २००६ मध्ये ही रक्कम १० लाख रुपये करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुणा कुणाला मिळाला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार

१) देविका राणी
२) बीरेंद्रनाथ सरकार
३) पृथ्वीराज कपूर
४) पंकज मलिक
५) सुलोचना
६) बी.एन. रेड्डी
७) धीरेंद्रनाथ गांगुली
८) कानन देवी
९) नितीन बोस
१०) रायचंद बोराल
११) सोहराम मोदी
१२) जयराज
१३) नौशाद
१४) एल. व्ही. प्रसाद
१५) दुर्गा खोटे
१६) सत्यजीत रे
१७) व्ही. शांताराम
१८ ) बोम्मीरेड्डी नागी रेड्डी
१९) राज कपूर
२० ) अशोक कुमार
२१ ) लता मंगेशकर
२२ ) अक्किनेनी नागेश्वर राव
२३) भालजी पेंढारकर
२४) भुपेन हजारिका
२५) मजरुह सुल्तानपुरी
२६) दिलीप कुमार
२७ ) डॉ. राजकुमार
२८) शिवाजी गणेशन
२९ ) कवी प्रदीप
३०) बलदेवराज चोप्रा
३१) हृषिकेश मुखर्जी
३२) आशा भोसले
३३) यश चोप्रा
३४) देव आनंद
३५) मृणाल सेन
३६) अदूर गोपालकृष्णन
३७) श्याम बेनेगल
३८) तपन सिन्हा
३९) मन्ना डे
४०) व्ही. के. मूर्ती
४१ ) डी. रामानायडू
४२) के. बालचंदर
४३) सौमित्र चॅटर्जी
४४) प्राण
४५) गुलजार
४६ ) शशी कपूर
४७ ) मनोज कुमार
४८ ) के. विश्वनाथ
४९) विनोद खन्ना (मरणोत्तर)
५० ) अमिताभ बच्चन<br>५१) रजनीकांत
५२ ) आशा पारेख
५३) वहिदा रेहमान