smart kitchen hacks: अशा अनेक गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो, त्यांचा योग्य वापर कसा करायचा हे आपल्याला माहीत नसते.अशाच काही गोष्टी आपण आपल्या स्वयंपाकघरातही वापरतो.कधी-कधी काही कंपन्या आपल्या प्रोडक्टचं असं काही पॅकेजिंग करतात,ज्यामुळे ग्राहकांना ते वापरणं सोपं जाईल, पण बऱ्याचदा ग्राहकांना त्या वस्तूचा योग्य वापर माहित नसतो. त्यांपैकीच एक आहे तेलाची बाटली.जेव्हा आपण स्वयंपाकघरात जातो तेव्हा स्वयंपाकासाठी सर्वात महत्वाचे असतं ते म्हणजे तेल. तेलाशिवाय कोणताही पदार्थ असशक्यच, सर्व प्रकारच्या पदार्थांसाठी तेल हे सर्वात महत्त्वाचे असते. स्वयंपाकाचे तेल बहुतेक प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये येते. आज आम्ही तुम्हाला तेलाच्या बाटलीच्या झाकणाशी संबंधित असा एक हॅक सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल.
जाणून घ्या योग्य पद्धत
काही तेलाच्या बाटलीचं पॅकेजींग हे ग्राहकांच्या सोयीसाठी बनवलं जातं, पण ग्राहक त्याचा भलताच वापर करतात. यासंबंधीत एक व्हिडीओसोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, जो ग्रृहिणींसाठी फायद्याचा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील आवाक झाले आहेत. खरंतर तेल वापरताना ते सांडू नये किंवा वापरताना अंगावर येऊ नये यासाठी या तेलाच्या बाटलीत आणखी एक झाकण दिलेलं असतं. आपण जेव्हा तेलाची नवीन बाटली फोडतो, तेव्हा आपल्याला ते झाकण दिसतं. अनेकांना वाटतं की घरी आणेपर्यंत या बाटलीमधून तेल लिक होऊ नये म्हणून ते ठेवलं जातं, ज्याचा वापर बाटली फोडल्यानंतर संपतो, पण तसं नाही.
हेही वाचा – BMW Full Form: ‘BMW’ चा फुलफॉर्म काय तुम्हाला माहितेय का? जाणून आश्चर्यचकित व्हाल!
तेल लिक होऊ नये म्हणून –
तेल लिक होऊ नये या उद्देशासाठी तर तेलाच्या झाकणाचा वापर होतोच, शिवाय या आतल्या झाकणाला टाकून न देता, ते झाकण पुन्हा उलटं करुन लावलं तर ते स्टॉपर म्हणून काम करतं, ज्यामुळे तेल पटकन अंगावर येत नाही. खरंतर या झाकणाचे काम म्हणजे तेलाचा फ्लो कमी करणे, म्हणजे भांड्यात जास्त तेल सांडणार नाही. यासाठी सर्वप्रथम बोटाने झाकण बाहेर काढावे लागते, नंतर ते फेकण्याऐवजी उलटे करून बाटलीच्या तोंडावर ठेवावे लागते. त्यानंतर प्लास्टिकच्या बाटलीच्या दातात ते अडकते, त्यानंतर जेव्हा भांड्यात तेल घेतले जाते तेव्हा तेल हळू हळू बाहेर पडतं.