देशाची राजधानी दिल्ली हे एक ऐतिहासिक शहर आहे. इतिहासकारांच्या मते, इसवी सन पूर्व ८० मध्ये गौतम वंशाचे राजा ढिल्लू यांनी या शहराचे नाव ढिल्ली ठेवले होते. पुढे तोमर वंशाचे राजा धव यांनी या शहराचे नाव ढिल्लू ठेवले. त्यानंतर ढिल्लूचे ढिल्ली झाले आणि ढिल्लीचे दिल्ली हे नाव पडले.
दिल्लीमध्ये अनेक राज्यांतील लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. भारतातील श्रीमंत शहरांपैकी एक असलेल्या दिल्लीला तीन सेक्टरमध्ये विभागले गेले आहे. दिल्ली, नवी दिल्ली आणि एनसीआर.

देशभरातून आणि देशाबाहेरून अनेक पर्यटक दिल्ली शहर पाहायला येतात. अशात दिल्ली, नवी दिल्ली आणि एनसीआरमधील फरक त्यांना अनेकदा माहिती नसतो.
आज आपण या तीन वेगवेगळ्या सेक्टरमधील फरक जाणून घेऊ या.

हेही वाचा : कार जुनी झाल्यानंतर विकायचा Perfect Time कसा ओळखाल? जाणून घ्या सविस्तरपणे..

दिल्ली (जुनी दिल्ली)

दिल्ली या शहराचा इतिहास खूप मोठा आहे. इतिहासात दिल्लीच्या गादीसाठीचा संघर्ष आपण वाचला असेल.
दिल्लीवर मुघल, खिलजी, तुघलक आणि सय्यद यांसारख्या वंशांचे राज्य राहिले. इतिहासात सांगितल्याप्रमाणे मुघल काळात हुमायूनने मुघलांना हरवून दिल्लीवर आपला विजय मिळवला होता. सतराव्या शतकात शाहजहाननी दिल्लीवर आपले वर्चस्व स्थापित केले. त्यानंतर दिल्लीला शाहजहानाबाद म्हणून ओळखू लागले, ज्याला आपण जुनी दिल्‍ली म्हणून ओळखतो.

दिल्ली – एनसीआर

दिल्ली एनसीआर (NCR) म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन होय. यामध्ये हरयाणाचे आठ जिल्हे, उत्तर प्रदेशचे १४ जिल्हे आणि राजस्थानच्या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. दिल्लीजवळच असल्याने या सेक्टरला दिल्ली एनसीआर सेक्टर म्हणून ओळखले जाते. या सेक्टरमध्ये एकूण १९ जिल्ह्यांचा समावेश आहे.

हेही वाचा : PVR चित्रपटगृहांत ‘I’ आणि ‘O’ हे दोन Rows नसतात; नेमकं कारण ठाऊक आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी दिल्ली

नवी दिल्ली हा दिल्लीचा एक लहान भाग आहे. असे म्हणतात की विसाव्या शतकात इंग्रजांनी हे सेक्टर बनवले होते. या परिसरात ब्रिटिशकालीन खूप सुंदर इमारती आहेत. याशिवाय संसद भवन, राष्ट्रपती भवन, कनॉट प्लेस, इंडिया गेटसारखी महत्त्वाची ठिकाणेही याच परिसरात आहेत.