scorecardresearch

हवेत उडणारे मासे पाहिलेत का? एक्सप्रेस ट्रेनहुन जास्त वेगाने घेऊ शकतात हवेत झेप, पाण्यात येताच…

Are There Flying Fish: ही माहिती वाचून आता तुम्हीही चक्रावून गेला असाल ना. काळजी करू नका हे प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊया…

Did You Know Flying Fish Can Fly In Air Fastest than Express Trains Know Unheard facts About Wild Life
हवेत उडणारे मासे पाहिलेत का? (फोटो: ट्विटर)

Flying Fish Interesting Facts: मछली जल की रानी है ही हिंदी भाषेतील कविता आपण अनेकदा ऐकली असेल. माशाला पाण्याबाहेर काढलं की तो मरतो हे काही नव्याने सांगायची गरज नाही, पण तुम्हाला माहित आहे का जगात असा एक मासा आहे जो चक्क हवेत उडू शकतो. या माशाचा वेग इतका अधिक आहे की तो चक्क ५६ किलोमीटर प्रतितास वेगाने उडू शकतो. हे मासे ६ मीटर उंचीवर उडू शकतो. ही माहिती वाचून आता तुम्हीही चक्रावून गेला असाल ना. काळजी करू नका हे प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊया…

उडणाऱ्या माशाविषयी न ऐकलेल्या गोष्टी

नॅशनल वाईल्डलाईफ फेडरेशनच्या माहितीनुसार, या माशांना रे फिश किंवा ग्लायडर म्हणून ओळखले जाते. या माशांना दोन्ही बाजूला पंख असतात ज्याच्या मदतीने ते ६ मीटरपर्यंत उंच उडू शकतात. या माशांची लांबी १७ ते ३० सेंटीमीटर असते. जेव्हा मोठ्या आक्रमक माशांपासून स्वतःचे संरक्षण करायचे असते तेव्हा ते हवेत झेप घेतात. हे मासे पाण्याच्या पृष्ठभागावर पोहत असतात व वारंवार हवेत उडून मग पुन्हा पाण्यात जातात.

ज्याप्रकारे डॉल्फिन श्वास घेण्यासाठी पाण्याच्या बाहेर येतात तशीच पद्धत हे मासेही वापरतात. एका उडीत हे मासे ६ मीटर उंचीवरून २०० मीटर पर्यंत प्रवास करू शकतात. पाण्यातून बाहेर उडताना हे मासे आपले पंख पसरतात जेव्हा त्यांना पाण्यात परत जायचे असते तेव्हा ते पंख पुन्हा खाली घेतात. हे मासे पाण्याच्या बाहेर व आत नीट स्पष्ट पाहू शकतात.

हे ही वाचा<< ५२८ किमी सलग धावणारी एकमेव भारतीय ट्रेन कोणती? महाराष्ट्रात ‘या’ स्थानकातुन जर ट्रेन चुकली तर थेट…

वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, जेव्हा तापमान २० डिग्रीच्या पेक्षा कमी असते तेव्हा हे मासे प्रभावीपणे उडू शकत नाही.या माशांच्या मांसपेशी कमी तापमानात कमकुवत होऊ शकतात. या माशांना फ्लाईंग फिश म्हणूनही ओलखले जाते.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 16:27 IST