Where Does Water Comes From In Coconut: देवाची करणी आणि नारळात पाणी.. ही म्हण आपण वर्षानुवर्षे ऐकली आहे. आणि खरंच एवढ्या कडक आवरणाच्या नारळात पाणी कुठून येतं ही मिस्ट्रीच आहे. शहाळ्यामध्ये पाणी कुठून येतं या प्रश्नाचं उत्तर आपण आज वैज्ञानिक कारणांसह जाणून घेणार आहोत. अगदी सोप्या भाषेत, नारळाचे पाणी हे एक द्रव आहे जे नारळाच्या मध्यभागी पोकळीत झिरपत असते. जसजसे नारळाचे वय वाढत जाते तसतसे ते द्रव घट्ट होते आणि पांढर्‍या मांसात बदलते जे आपण खोबरं म्हणून खातो. नारळाच्या पाण्यामध्ये साधारण ४५ ते ६० कॅलरीज असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैज्ञानिक भाषेत समजून घ्यायचे झाल्यास नारळामध्ये असणारे पाणी हे एंडोस्पर्मचा भाग असते जे अँजिओस्पर्मसह फर्टिलायजेशन होताच न्युक्लेयस मध्ये बदलते. अगदी कोवळ्या शहाळ्यात असणारे पाणी हे रंगहीन व पातळ स्वरूपात असते. जसा नारळ जुनाट होतो तसे हे पाणी मांसाळ खोबऱ्यात बदलते. नारळाची मुळे ही जमिनीतील पाणी शोषून नारळाच्या आत पोहोचवतात. न्युक्लेयससह प्रक्रिया होऊन मग हे पाणी घट्ट होत जाते व खोबरे तयार होते. या खोबऱ्यात पोटॅशियम व मँग्नेशियम मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.

हे ही वाचा<< Video: गॅसची आच अर्धवटच पेटते? ‘या’ टिप्स वापरून बर्नर करा स्वच्छ, कुकिंगचा वेळ होईल अर्धा

नारळाच्या पाण्यात असणारे पोटॅशियम हे व्यायामानंतर आपल्या शरीरातील द्रव संतुलित करण्यास मदत करते. खरं तर, क्रीडा आणि व्यायामामध्ये मेडिसिन आणि सायन्सने एकत्रित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की नारळाचे पाणी आपल्याला नियमित पाण्यापेक्षा अधिक चांगले हायड्रेट करू शकते. म्हणून, सर्वच सीझनमध्ये हायड्रेटेड राहण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

हे ही वाचा<< दीड लिटर दुधाने बनवा अर्धा किलो तूप; पहा घरगुती सोपी रेसिपी

नारळ पाणी पिण्याचे आपल्या शरिराला अनेक फायदे आहेत. हे आपण नेहमी ऐकत असतो. शिवाय आजारपणात देखील डॉक्टर रुग्णांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा धोका या सगळ्यावर नियमित नारळ पाण्याचे सेवन गुणकारी ठरू शकते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know how does coconut gets water inside strong shell scientific answers how khobra is made svs
First published on: 22-01-2023 at 13:08 IST