which company has the most e-buses in India? इलेक्ट्रिक बस ध्वनी आणि वायूद्वारे होणारे प्रदूषण कमी करते. शहरातील रहिवाशांच्या राहणीमानात सुधारणा करते. प्रदूषण कमी करण्यासह भविष्यातील पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि लहान इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर दिला जात आहे. सध्याच्या काळात इलेक्ट्रिफाइड वाहतुकीकडे वाटचाल ही जास्तीत जास्त अपरिहार्य होत चालली आहे. इलेक्ट्रिक वाहने ही खूप उत्तम निवड आहे. विशेषत: आपण ज्या वातावरणात राहतो, त्यासाठी व सभोवतालच्या लोकांसाठी ती महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळात वाहतूक हे एक मोठे शाश्वत आव्हान आहे. त्यामुळे निर्माते आणि आपल्यासारखे लोक इलेक्ट्रिक फ्लीट वाहनांकडे वळण घेत मोठी भूमिका बजावू शकतात. इलेक्ट्रिक वाहन घेण्याचे अनेक फायदे आहेत. केंद्र, तसेच राज्यातील सरकारांनाही सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेसचा वापर वाढवला आहे. पण, तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या आहेत? चला जाणून घेऊ…
भारतात सध्याच्या घडीला टाटा मोटर्सच्या सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेस रस्त्यांवर धावत आहेत. बाजारात या कंपनीचा वाटा सर्वाधिक आहे. रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेस टाटा मोटर्सच्या आहेत. टाटा मोटर्सच्या या वाहनांचा बाजारात ४८ टक्के हिस्सा आहे. टाटा मोटर्सनंतर दुसरी कंपनी आहे जेबीएम ऑटो. जेबीएम ऑटोचा बाजारातील हिस्सा १४.१६ टक्के. ऑलेक्ट्रा ग्रीन टच या कंपनीचा बाजारातील हिस्सा १४.०८ टक्के व पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी या कंपनीचा इलेक्ट्रिक बसमधील हिस्सेदारी १०.३० टक्के आहे.
पेट्रोल किंवा डिझेलवरील वाहनांच्या तुलनेत या वाहनांचा दैनंदिन रनिंग व मेंटेनन्स खर्च खूप कमी असतो. सामान्य कारच्या तुलनेत ईव्हीचा मेंटेनन्स खर्च सुमारे ५०% कमी असतो.कारण- ईव्ही इंटर्नल कंबस्शन इंजिन (आयसीई) इतर वाहनांच्या तुलनेत अधिक विश्वसनीय आहे. काही मेकॅनिकल पार्ट्स फेल होऊ शकतात; परंतु अधिक सक्रिय मेंटेनन्ससाठी ही वाहने नेहमीच चांगला डेटा प्रदान करतात.
या तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला चार्जिंग स्टेशनवर चार्ज केलेल्या बॅटरीच्या बदल्यात डिस्चार्ज बॅटरी बदलून घेता येते. हे तंत्रज्ञान अद्याप विकसित होत असून, या तंत्रज्ञानाचे मोठ्या प्रमाणावर अवलंबन होईल, तेव्हा इलेक्ट्रिक वाहनांना कार खरेदीदारांकडून प्राधान्य दिले जाईल. आयसीई वाहनांच्या तुलनेत बऱ्याच ईव्ही आरामदायी व अधिक सहज ड्रायव्हिंगचा अनुभव प्रदान करतात. बॅटरीचे वजन वाहून नेण्यासाठी सस्पेन्शन मजबूत असले पाहिजे. ही वाहने गोंगाटाअभावी चालवताना आरामदायक वाटतात.