Male River Name: भारताला नद्यांचा (River) देश म्हटले जाते. येथे असंख्य लहान-मोठ्या नद्या आहेत. याच कारणामुळे भारत हा विविध दृष्टींनी समृद्ध आहे. भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत शेकडो नद्या वाहतात. या नद्या भारताच्या वेगवेगळ्या भागांतून वाहतात. तसेच भारतातील काही नद्या अधिक प्रसिद्ध आणि चर्चेचा विषय ठरत असतात. भारतात नद्यांची पूजा केली जाते. अनेक नद्यांना आई, देवी मानून पूजले जाते. या नद्यांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. प्रत्येक नदीचे एक खास वैशिष्ट्य आहे. नद्यांसाठी नेहमी स्त्रीलिंगी शब्दाचा वापर केला जातो. खरे तर आपल्या देशातील सगळ्या नद्यांची नावे ही स्त्रीलिंगी आहेत. मात्र, भारतात अशीही एक नदी आहे, जिला पुरुष नदी म्हणतात. ही नदी कोणती आहे ते तुम्हाला माहितीये का, चला तर जाणून घेऊ…

ही नदी फक्त भारतातच वाहते का?

तिबेटमधून उगम पावणारी ही नदी फक्त भारतातूनच न वाहता, ती तिबेट, भारत व बांगलादेश या तीन देशांमधून वाहते. ती भारतातून जाते आणि बांगलादेशला पोहोचते. खरे तर या नदीचे उगमस्थान तिबेटच्या पुरंग जिल्ह्यात असलेल्या मानसरोवर तलावाजवळ आहे. ही नदी भारतातील सर्वांत लांब नदी आहे. तिची एकूण लांबी २,९०० कि.मी. असून, भारतामध्ये या नदीची लांबी ९१६ कि.मी. आहे.

चीनमधील तिबेट प्रदेशात तिला ‘त्सांग पो’ आणि बांगलादेशमध्ये तिला ‘जमुना’ या नावाने ओळखले जाते. या नदीचा विस्तार नदीखोऱ्याच्या उतरत्या क्रमानुसार चीन, भारत, बांगलादेश, भूतान या देशांत झाला आहे. तसेच भारतामध्ये नदीखोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय, नागालॅण्ड, सिक्कीम, मणिपूर या राज्यांमध्ये तिचा विस्तार झाला आहे. ही नदी कोणती आहे, जाणून घेऊया…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतातील पुरुष नाव असलेली एकमेव नदी कोणती?

ही नदी ‘ब्रह्मपुत्रा’ आहे, जी भारतातील एकमेव पुरुष नदी असल्याचे म्हटले जाते. वेदांमध्ये या नदीचं वर्णन पुल्लिंगी केले आहे. ब्रह्मपुत्र या नदीचा पौराणिक कथांशी संबंधित आहे. पुराणांतल्या संदर्भानुसार, नदीच्या ब्रह्मपुत्रा या नावाचा ब्रह्मदेवाचा पुत्र, असा अर्थ होतो. त्यामुळे या नदीला पुल्लिंगी म्हटले जाते. अर्थाच्या अनुषंगानेच या नदीला ब्रह्मपुत्रा हे नाव मिळाले आहे. या कारणामुळेच अनेक जण ब्रह्मपुत्रा या नदीचा ब्रह्मपुत्र, असा पुल्लिंगी उल्लेख करतात. पौरानिक काळापासून नद्यांना विशेष स्थान दिलं जातं आणि अजूनही त्यांची खास मान्यता आहे.