दुचाकी, कार, रिक्षा असो किंवा मालवाहू वाहनाची खरेदी केल्यानंतर तुम्हाला मोटार वाहन विभागाकडे ( आरटीओ ) नोंदणी करावी लागते. भारतात प्रत्येक वाहनाची नोंदणी मोटार वाहन कायदा १९८९ अंतर्गत केली जाते. आरटीओकडे नोंदणी केल्यावर चालकाला नंबर प्लेट मिळते, ज्यावर कोड आणि नंबर लिहिलेला असतो. काही नंबर प्लेटवर IND लिहिलेलं तुम्ही पाहिलं असेल. पण, नंबर प्लेटवर IND काय लिहिले जाते? यामागाचं कारण काय? हे आपण जाणून घेणार आहोत…

IND हा शब्द भारताला अनुसरून घेतला आहे. बऱ्याच वाहनांवरील नंबर प्लेटमध्ये होलोग्रामसह IND हा शब्द लिहिलेला असतो. IND शब्द उच्च सुरक्षा नंबर प्लेटचा एक भाग आहे. २००५ साली १९८९ च्या मोटार वाहन कायद्यात बदल करून उच्च सुरक्षा नंबर प्लेट आणली गेली. आरटीओच्या नोंदणीकृत नंबर प्लेटवर IND हा शब्द आढळतो.

‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Naxalite, Rupesh Madavi, encounter,
नक्षलवादी चळवळीला हादरा; कमांडर रुपेश मडावी चकमकीत ठार…
Selfie Point, Constitution , Constitution Temple,
संविधान मंदिराचा ‘सेल्फी पॉइंट’ कुणासाठी?
stock market Nifty Nifty Index investment
बाजाराचा तंत्र-कल : निफ्टीच्या २५,८०० ते २६,१०० या तेजीच्या वाटचालीतील अवघड टप्पा
Loksatta editorial Narendra modi statement Karnataka govt arrested ganesh murti congress
अग्रलेख: कर्मभूमीतील धर्मकसोटी!
mahavitaran new smart meter marathi news
‘स्मार्ट’ मीटर लावणे ‘शहाणपणा’चे आहे का?
Pregnancy Tourism and The Aryans Of Ladakh Latest Marathi News
Pregnancy tourism in Ladakh: प्रेग्नन्सी टुरिझम म्हणजे नक्की काय? या संकल्पनेचा संबंध इतिहासातील आर्यांच्या टोळीशी कसा जोडला गेला?

हेही वाचा : उंदीर प्रत्येक वस्तू कुरतडत का असतो? कुरतडलं नाही तर काय होतं? जाणून घ्या… 

विक्रेत्याने ही नंबर प्लेट कायद्यानुसार घेतली असेल, तर त्याच्यावर एक क्रोमियम-प्लेटेड होलोग्राम देखील जोडलेला आहे, जो काढला जाऊ शकत नाही. तसेच, नंबर प्लेटच्या सुरक्षतेबाबत काळजी घेण्यात आली आहे. यात ‘स्नॅप लॉक’ यंत्रणा बसवण्यात आली आहे. जी काढता येत नाही. रस्त्याच्या कडेला उसलेल्या विक्रेत्यांनाही ‘स्नॅफ लॉक’ची नकल करता येत नाही.

हेही वाचा : निवडणुकीत बोटावर लावण्यात येणारी शाई कुठं तयार होते? काय आहे तिचा इतिहास? जाणून घ्या…

ही नंबर प्लेट असलेल्या चालकांना वाहन चोरी, दहशतवादी आणि गैरवापरापासून संरक्षण मिळतं. तसेच, नंबर प्लेटवरील होलोग्रामवर असलेला कोड नोंद असतो. त्यामुळे कुठेही अपघात किंवा चुकीची घटना घडल्यास वाहनाच्या मालकाची माहिती तात्काळ मिळते. त्यामुळेच याला उच्च सुरक्षा नंबर प्लेट म्हणतात.