Toilets Museum : आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टी या अपडेटेड व्हर्जन आहेत, म्हणजेच त्या वस्तू काळानुसार बदलत गेल्या. जसे की खाण्याच्या सवयी, जीवनशैली, मोबाइल फोन, टीव्ही, घरे आणि शौचालयसुद्धा. पण, तुम्हाला प्रश्न पडला असेल की जुन्या वस्तूंचे संग्रहालय असते, पण जुने शौचालये कसे बघावे? पण तुम्ही जुने शौचालये बघू शकता. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. हो, आपल्या देशात नवी दिल्लीमध्ये शौचालय संग्रहालय आहे. हे शौचालय संग्रहालय काळानुसार शौचालयात झालेले बदल व त्याचे नमुने दाखवते.

शौचालय संग्रहालय का स्थापन करण्यात आले? (Why was Museum of Toilets established)

येणाऱ्या पिढीने जुन्या गोष्टी बघाव्यात आणि त्या वस्तूंचा इतिहास समजून घ्यावा, हे कोणत्याही संग्रहालयाचे प्रमुख उद्दिष्ट असते. नवी दिल्लीतील महावीर एन्क्लेव्ह परिसरात प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या शौचालयांचा संग्रह आहे. हे संग्रहालय देशभरात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आले आहेत. TIME मासिकेने या संग्रहालयाला जगातील सर्वात विचित्र संग्रहालयांपैकी एक असल्याचे नमूद केले आहे.

अनेकांना या संग्रहालयाविषयी माहिती नाही. हे संग्रहालय १९९२ मध्ये स्थापन करण्यात आलं. या संग्रहालयात ५० देशांमधील शौचालयाच्या कलाकृती आहेत, ज्या तीन गटांत विभागल्या आहेत. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. या कलाकृती ३००० इसवी सन पूर्व ते २० व्या शतकापर्यंतच्या आहेत, जे मनोरंजन इतिहासाची माहिती देतात.

या संग्रहालयात तुम्हाला विविध प्रकारचे शौचालय दिसेल. एक कमोड वापरण्यासाठी लाकडी पेटीत बंद करावे लागते. काही शौचालय सोन्या चांदीपासून बनवलेले आहेत. १९२० च्या दशकात अमेरिकेत वापरलेले दोन मजली शौचालयसुद्धा या संग्रहालयात दिसून येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेळ आणि पत्ता

तुम्हाला या संग्रहालयाला भेट द्यायची असेल तर तुम्ही नवी दिल्ली येथील महावीर एन्क्लेव्ह परिसरात पालम डाबरी रोडवर स्थित असलेल्या सुलभ भवन येथे भेट देऊ शकता. सकाळी १०.३० पासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे संग्रहालय सुरू असते.