Extramarital Affair : तुम्ही जेव्हा कधी एखाद्या कंपनीत जॉईन करण्यासाठी जाता, तेव्हा कंपनी त्यांच्या पॉलिसीबाबत माहिती देत असते. पॉलिसीनुसार तुम्हाला काही सुविधाही दिल्या जातात आणि काही प्रकारची कामे न करण्यासाठी सांगितलं जातं. जर तुम्ही कंपनीच्या पॉलिसीचं पालन करत नसाल, तर नोकरी गमावण्याचा धोका वाढत राहतो. कंपनी त्यांचे सर्व नियम आणि अटींबद्दल सांगत असते आणि जॉयनिंगच्या वेळी कर्मचारी या नियम व अटींना स्वीकारत असतात. अनेकदा काही नियम आणि अटी खूप अजब असतात. जसं की विवाहबाह्य संबंध असल्यावर नोकरीवरून काढून टाकणे.

विवाहबाह्यसंबंध असल्यावर नोकरीचा धोका

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये एका अजब कंपनीबाबत माहिती दिली आहे. ही चीनची कंपनी आहे. या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत की, विवाहबाह्य संबंध असल्यावर त्यांना नोकरी गमवावी लागू शकते. कंपनीने ९ जूनला या भन्नाट नियमांबाबत त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे.

नक्की वाचा – लॅपटॉपवर सतत काम केल्यावर डोळ्यांवर काय होतो परिणाम? ‘या’ उपाययोजना करून डोळ्यांच्या समस्येवर करा मात

कंपनीने का बनवला असा नियम?

कंपनीने विवाहबाह्य संबंधांना थांबवण्यासाठी छोट्या-मोठ्या सर्व कर्मचाऱ्यांना हा नियम लागू केला आहे. आता प्रश्न असा आहे की, हा नियम कंपनीने का लागू केला? कंपनीचं म्हणणं आहे की, विवाहबाह्य संबंध रोखण्याचा नियम संस्थेच्या अंतर्गत गोष्टींना मजबूत करण्यासाठी सुरु केला आहे. कॉर्पोरेट कंपनीमध्ये कुणालाही कुटुंबासाठी प्रामाणिक असणे गरजेचं आहे. कुंटुंबाच्या सुरक्षेचा विचार करणे आवश्यक आहे. याशिवाय कंपनीने घटस्फोटावरही निर्बंध घातले आहेत.

कर्मचाऱ्यांना हा बदल अजब वाटला

कंपनीला त्यांचे बनवलेले नियम चांगले आणि योग्य वाटत आहेत. पण दुसरीकडे कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. कंपनीला असा नियम बनवण्याची काय गरज पडली, अशा प्रतिक्रिया कर्मचारी वर्गाकडून उमटत आहेत.