जर्नल ऑफ बायोलॉजिकल रिदम्समधील निरीक्षणात्मक अभ्यासानुसार, दुपारी SARS-CoV-2 लस घेतलेल्या आरोग्यसेवा कर्मचार्‍यांमध्ये सकाळी लसीकरण केलेल्या लोकांपेक्षा जास्त अँटीबॉडीची पातळी आढळून आली. हार्वर्ड विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी त्यांचे निष्कर्ष जर्नल ऑफ बायोलॉजिकल रिदममध्ये प्रकाशित केले आहेत. डिसेंबर २०२० आणि फेब्रुवारी २०२१ दरम्यान फायझर किंवा अ‍ॅस्ट्राझेनेका कोविड-१९ लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील २,१९० आरोग्य-सेवा कर्मचार्‍यांच्या रक्ताच्या नमुन्यांमधील अँटीबॉडीची पातळी तपासली होती.

यामध्ये संशोधकांना असे आढळून आले की, दुपारी ३ च्या दरम्यान लसीकरण झालेल्या लोकांमध्ये अँटीबॉडीचा प्रतिसाद सर्वाधिक होता आणि रात्री ९ लसीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये प्रमाण कमी होते. “आमचा निरीक्षण अभ्यास या संकल्पनेचा पुरावा देतो की दिवसाची वेळ कोविड लसीकरणाच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करते,” असे सह-वरिष्ठ लेखिका एलिझाबेथ क्लेरमन यांनी म्हटले आहे.

उदाहरणार्थ, क्लेर्मन चाचण्यांकडे लक्ष वेधतात ज्यात असे दिसून आले आहे की काही केमोथेरपी औषधे कर्करोगाच्या पेशींना प्रभावीपणे लक्ष्य करतात पण दिवसाच्या विशिष्ट वेळी ते घेतल्यास इतर पेशींवर ते मर्यादित परिणाम करतात. इन्फ्लूएंझा लसींचे परीक्षण करणार्‍या २००८ च्या अभ्यासात असेही आढळून आले की सकाळी लसीकरण केलेल्या वृद्ध लोकांमध्ये दुपारच्या वेळी लसीकरण केलेल्या लोकांपेक्षा प्रतिपिंडाचे प्रमाण जास्त होते.

मात्र, २००८ च्या फ्लू लसीच्या अभ्यासाचे परिणाम क्लेर्मनच्या संशोधनाच्या निष्कर्षांच्या विरोधात असल्याचे दिसते. ज्यामध्ये असे आढळून आले की दुपारच्या वेळी लसीकरण केल्याने प्रतिपिंड पातळी इतर वेळेपेक्षा जास्त होते. तसेच याचा अभ्यास करणाऱ्यांनी नमूद केले की त्यांच्याकडे वैद्यकीय आणि औषधांच्या इतिहासावरील माहितीची कमतरता आहे. याव्यतिरिक्त, आरोग्य सेवा कर्मचार्‍यांची झोप आणि कामाचे तास विचारात घेतले नाहीत.

दरम्यान, संशोधकांना असे आढळून आले की ज्यांना नंतर लसीकरण करण्यात आले त्या प्रत्येकासाठी अँटीबॉडीचे प्रमाण सामान्यतः जास्त होते. ज्यांना फायझरची लस मिळाली आहे त्यांच्यामध्ये, महिलांमध्ये आणि तरुण लोकांमध्ये, लसीकरणाच्या दिवसाच्या परिणामाव्यतिरिक्त, प्रतिपिंडांचे प्रमाणदेखील जास्त होते.