अनेक कारखान्यांवर किंवा काही गोडाऊनच्या छतावर तुम्ही वाऱ्याच्या वेगानुसार फिरणारे एक मोठे गोलाकार यंत्र पाहिले असेल. दिवस असो वा रात्र तुम्ही कधीही पाहिलात तरी ते यंत्र तुम्हाला सतत फिरताना दिसते. पण हे यंत्र नेमक कशासाठी बसवण्यात आले आहे? किंवा त्याचा काय उपयोग असतो? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे. याचे उत्तर होय असे असेल तर, या बातमीतून तुम्हाला याच यंत्राचा उपयोग का आणि कशासाठी केला जातो सविस्तर समजणार आहे.
कारखान्यावर हे यंत्र का बसवले जाते?
कारखान्यावर बसवण्यात येणारे ते गोलाकार यंत्र काही खास हाय टेक्नोलॉजीचे नसून तो सामान्य पंखा आहे. या पंख्याची खास गोष्ट म्हणजे त्यात कोणत्याही खास इलेक्ट्रिक मोटरची गरज लागत नाही, जे एक प्रकारे वेंटिलेशन फॅन आहे, जो कोणत्याही मोठ्या कारखान्यात आणि गोडाऊनमध्ये वेंटिलेशनसाठी वापरला जातो. यामुळे हवा आत-बाहेर होत राहते. आजकाल अनेक कारखान्यांवर हे पंखे वेंटिलेशनसाठी वापरले जात आहेत.
हे घरामध्येही प्रकाश पोहचवण्याचे आणि वेंटिलेशनचे काम करते. हे गोलाकार पंखे जास्त करून फक्त हवा पास करण्यासाठी वापरले जातात. ज्या ठिकाणी टिन शेटचे शेल्टर बनवलेले असते, त्या ठिकाणी त्याचा अधिक वापर केला जातो. कारखान्यात किंवा गोडाऊनमध्ये टिन शेट असल्यास तेथे वेंटिलेशनची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण वादळ किंवा सोसाट्याच्या वाऱ्यात अनेक समस्या येऊ शकतात, म्हणूनच टिन शेटच्या कंस्ट्रक्शनमध्ये या गोल एक्झॉस्ट किंवा वेंटिलेशन फॅनचा वापर केला जातो.
हे छताच्या वर लावण्यात येणारे विशेष व्हेंटिलेटर आहेत. त्यांना टर्बो व्हेंटिलेटर किंवा रूफ टॉप व्हेंटिलेटर देखील म्हणतात. हे अतिशय मंद गतीने फिरतात आणि कारखान्यांमधील गरम हवा बाहेर काढण्याचे काम करतात. जेव्हा जेव्हा गरम हवा वर जाते तेव्हा ती या यंत्रातून बाहेर जाते. हळू हळू फिरणाऱ्या या पंख्यातील पंखे वेगळ्या प्रकारचे असतात जे वाऱ्याच्या वेगानुसार दिशा बदलून फिरू लागतात.