कोणत्याही ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्या मिळणं खूप खास गोष्ट असते. विशेषत: जेव्हा तुम्ही खासगी ठिकाणी काम करता त्यावेळी सुट्ट्यांवरून अनेक गोंधळ उडालेला पाहायला मिळतो. कर्मचारी जेवढ्या सुट्ट्या घेतो, त्यापेक्षा जास्त सुट्ट्या त्याला अधिकृतरित्या मिळू शकतात. कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुट्ट्यांबाबत माहित नसतं. त्यामुळे ते त्यांच्या सर्व सुट्ट्यांचा लाभ घेत नाहीत. याच सुट्ट्यांपैकी एक आहे गार्डनिंग लिव्ह. अनेक लोकांना या सुट्ट्यांबाबत पहिल्यांदाच कळलं असेल. भारतीय कंपन्यांमध्ये या सुट्ट्या मिळतात का? जर सुट्ट्या देत असतील तर तुम्ही या सुट्ट्यांसाठी कशाप्रकारे अप्लाय करू शकता? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

गार्डन लिव्ह काय असते?

गार्डन लिव्ह एखाद्या कर्मचाऱ्याला तेव्हा मिळते, जेव्हा तो कर्मचारी कंपनीत राजीनामा देतो आणि त्याचा नोटिस पीरिएड सर्व करत असतो. याचसोबत जर तो वर्क फ्रॉम होम म्हणजेच ऑफिसपासून दूर राहून काम करत असेल, तेव्हाही त्याला गार्डन लिव्ह दिली जाते. या लिव्हची सर्वात खास गोष्ट अशी आहे की, या सुट्ट्या तुम्ही नोटिस पीरिएड दरम्यान घेऊ शकता आणि यासाठी कंपनी तुमचे पैसेही कमी करणार नाही.

नक्की वाचा – मुकेश अंबानी यांच्यानंतर मुंबईत ‘या’ ठिकाणी आहे सर्वात महागडं घर, उद्योगपतीचं नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

कोणत्या देशात या सुट्ट्यांबाबत कायदा आहे?

गार्डन लिव्हचं चलन जगात ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशात आहे. वर्ष २०१८ मध्ये अमेरिकेतही याविषयी कायदा बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. पण भारताबद्दल बोलायचं झालं तर, भारतात या सुट्ट्यांबाबत विशेष कायदा नाहीय. परंतु, खासगी कंपनीत याबाबत विचारविनिमय सुरु आहे. काही खासगी कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना गार्डन लिव्ह देण्याबाबत विचार करत आहेत. मात्र, हा कायदा पूर्णपणे केव्हा लागू करण्यात येईल याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनी जबरदस्तीने गार्डन लिव्हवर पाठवू शकते

अनेकदा कंपनी जबरदस्तीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना गार्डन लिव्हवर पाठवते. जेव्हा एखादी कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकते आणि त्यांना असं वाटतं की, तो कर्मचारी कार्यालयात येऊन गोंधळ घालू शकतो किंवा कार्यालयाच्या सूचनांच पालन करणार नाही. अशा परिस्थितीत कंपनी कर्मचाऱ्यांना गार्डन लिव्हवर पाठवतात. म्हणजेच नोटिस पीरिएड दरम्यानही कर्मचारी घरी राहू शकतो आणि त्याला पगारही पूर्ण मिळेल.