scorecardresearch

कॉन्फरन्स कॉल करायचाय? मग फॉलो करा ‘या’ ४ सोप्या टिप्स

मोबाईलवरून कॉन्फरन्स कॉल कसा करायचा जाणून घ्या.

कॉन्फरन्स कॉल करण्यासाठी फॉलो करा 'या' ४ सोप्या टिप्स
How do I make a conference call (photo credit- indian express)

मोबाईल कॉलिंगवर बोलताना तुम्ही अनेकांकडून कॉन्फरन्स कॉल नाव ऐकलं असेल. अनेक जण कॉन्फरन्स कॉलवर बोलतही असतील पण काहींना अद्याप कॉन्फरन्स कॉल कसा करतात किंवा कॉन्फरन्स कॉल म्हणजे नेमकं काय हे माहित नाही. काहीजण कॉन्फरन्स कॉल करण्याचा प्रयत्नही करतात पण त्यांना ते सहज जमतं नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मोबाईलवरून कॉन्फरन्स कॉल कसा करतात आणि कॉन्फरन्स कॉल म्हणजे नेमकं काय हे सांगणार आहोत. तुम्हाला मोबाईलवरून कॉन्फरन्स कॉल करायचा असे तर खाली दिलेल्या काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

अद्याप असे अनेक लोक आहेत जे मोबाईलवर कॉन्फरन्स कॉल कसा करायचा याची माहिती जाणून घेण्यासाठी एकतर यूट्यूब किंवा गुगल सर्चचा पर्याय निवडतात. पण अनेकदा अँड्रॉइड मोबाईलवरून कॉन्फरन्स कॉल कसा करायचा याची गुगलवरही अचूक माहिती दिली जात नाही.

कॉन्फरन्स कॉल म्हणजे काय?

कॉन्फरन्स कॉल हा कोणीही करु शकतो. यात सर्वप्रथम एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कॉल करतो, या व्यक्तीशी बोलत असतानाचं, त्यात आणखी एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींवा कॉल करून अॅड करू शकता. याला एकप्रकारे ग्रुप कॉलिंग देखील म्हणतात. यात जर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल डियू कॉन्फरन्स कॉल असेल, तर तुम्ही गुगल डियू व्हिडिओ कॉलिंगवरूनही ग्रुप व्हिडिओ कॉल करू शकता. याशिवाय व्हॉटसअॅपवरही आता एकाचवेळी अनेक जण व्हिडिओ कॉलिंग करू शकता, या दोन्ही अॅप्सवर कॉन्फरन्स कॉलसह कॉन्फरन्स व्हिडीओ कॉलिंगचं ऑप्शन आहे. यामुळे मोबाईलवरून एकाचवेळी अनेक व्यक्तींसह बोलणं शक्य होतं.

याचा कन्फर्म स्कूल म्हणजे ग्रुप कॉलिंग देखील म्हणतात, याचा अर्थ तुम्ही फोनवरून एकाऐवजी पाच किंवा अधिक लोकांशी एकाचवेळी बोलू शकता.

कॉन्फरन्स कॉल कसा करायचा? फॉलो करा ‘या’ टिप्स

मोबाईलमधून फ्री कॉन्फरन्स कॉल करणं खूप सोपे आहे. आता तुम्हालाही हे शिकायचं असेल खालील काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

१) कॉन्फरन्स कॉल करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॉल करा.

२) तुम्ही ज्याला कॉल केला आहे तो व्यक्ती कॉल रिसिव्ह करण्याची प्रतीक्षा करा. त्या व्यक्तीने तुमचा कॉल रिसिव्ह केल्यावर तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर काही ऑप्शन दिसतील, त्यातील अॅड कॉल बटणचं ऑप्शनही दिसेल.

३) आता अॅड कॉल बटणावर क्लिक करा आणि तुम्ही कॉन्फरन्स कॉलमध्ये ज्या व्यक्तीला अॅड करायचं आहे त्याला कॉल करा.

४ ) ती व्यक्ती जेव्हा तुमचा कॉल उचलेल तेव्हा मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला merge हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

आता तुम्ही एकाचवेळी तीन जण एका कॉलवर बोलू शकता. जर तुम्हाला आणखी लोकांना या कॉलमध्ये अॅड करायचं असेल तर पुन्हा अॅड कॉलवर क्लिक करून आणखी लोकांना अॅड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही कोणालाही फ्री कॉन्फरन्स कॉल करू शकता.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 10:11 IST