Covid 19 Booster Dose : चीनमध्ये BF.7 या कोरोनाच्या व्हेरिएंटने हाहाकार माजवला आहे. या देशात दररोज १० लाख कोविड प्रकरणे आणि ५ हजार मृत्यूंची नोंद होत असल्याची शक्यता आहे. गेल्या कोविड लाटेच्या तुलनेत हा रोगाचा सर्वात मोठा उद्रेक असल्याचे म्हटले जाते. चीनमधील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आणि आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. आतरराष्ट्रीय प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जात आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रतिकारशक्ती सज्ज व्हावी यासाठी नागरिकांना बुस्टर डोस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. आज आपन Covid 19 Booster Dose ऑनलाइन कसे बुक करावे? याबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुस्टर डोस का महत्वाचा?

पहिल्या दोन डोसचे संरक्षण कालांतराने कमी होईल, त्यामुळे कोविड लसीचा बुस्टर डोस महत्वाचा आहे. बुस्टर डोस कोविड विषाणूला लढा देण्यासाठी रोगप्रतिकारशक्तीला मदत करेल. चीनमध्ये थैमान घालणारा कोरोना विषाणू जगातील इतर देशांमध्ये पसरत आहे. हा विषाणू भारतातही फैलावू शकतो. म्हणून बुस्टर डोस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. बुस्टर डोस हा लसीचा तीसरा डोस आहे. तुम्ही कोविड किंवा कोव्हॅक्सिनचा डोस घेतला असेल तर तीसरा डोस तुम्हाला त्याच लसीचा घ्यावा लागेल.

हेही वाचा – विश्लेषण: करोनाचा पुन्हा प्रसार होणार? सामना करण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’ आणि ‘हायब्रिड इम्युनिटी’ ठरणार उपयोगी; यातला नेमका फरक काय?

कुठे मिळणार?

बुस्ट डोस तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खासगी लसीकरण केंद्रातून मिळवू शकता. यासाठी तुम्हाला पहिला आणि दुसरा डोस घेतल्याबाबत माहिती असलेले अंतिम प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल.

नागरिकांनी लसीकरणाचे अंतिम प्रमाणपत्र सोबत बाळगावे. पूर्वी घेतलेल्या डोससाठी वापरण्यात आलेला मोबाईल क्रमांक आणि आयडी कार्ड वापरावा, असे कोविन संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा – करोनाच्या नव्या लाटेमुळे चीनसमोर आर्थिक संकट! पगार न मिळाल्याने अनेक शहरांमध्ये नागरिकांची आंदोलनं; पाहा Video

COVID 19 बूस्टर डोससाठी ऑनलाइन बुकिंग कसे करावे?

  • तुम्ही बुस्टर लसीची अपॉइंटमेंट कोविन संकेतस्थळ किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे ऑनलाइन बुक करू शकता.
  • कोविनवरून लसीकरण बूक करण्यासाठी अधिकृत पोर्टल कुठल्याही ब्राऊजरवर उघडा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे संकेतस्थळावर लॉगिन करा. यावेळ पहिला आणि दुसरा डोस घेताना तुम्ही ज्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली होती तोच क्रमांक वापरा.
  • CoWIN संकेतस्थळावर तुम्हाला पूर्वी घेतलेल्या लसींचे प्रमाणपत्र दिसून येतील. आता बुस्टर डोससाठी बुकिंग करण्यासाठी तुम्ही त्यासाठी पात्र आहे का? हे तपासा. तुम्ही दुसरा डोस घेतल्यानंतर ९ महिन्यांनी बुस्टर डोस घेऊ शकता. तुम्हाला डोससाठी कोविन संकेतस्थळावर सूचित केले जाईल.
  • तुम्ही बुस्टर डोससाठी पात्र असल्यास नोटिफिकेशनच्या शेजारी असलेल्या शेड्युल पर्यायावर क्लिक करा.
  • उपलब्ध लसीकरण केंद्रे शोंधण्यासाठी पिनकोड किंवा जिल्ह्याचे नाव टाका.
  • आता उपलब्ध व्हॅक्सिनेशन केंद्र तपासा आणि तारीख आणि वेळ निवडून अपॉइंटमेंट बूक करा. तुम्ही खासगी रुग्णालयाची अपॉइंटमेंट बूक करत असाल तर तुम्हाला डोससाठी पैसे द्याव लागतील.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to book for covid 19 booster dose online follow this steps ssb
First published on: 26-12-2022 at 09:59 IST