How To Clean White Shoes : आपण वेगवेगळ्या ड्रेस कोडवर मॅच होतील अशा चपला, शूज खरेदी करत असतो. आपण कपड्यांच्या रंगानुसार आणि स्टाईलनुसार चप्पल, शूज घालतो. अनेकांकडे पांढऱ्या रंगाचे शूज असतातच. पांढरे शूज घातल्यानंतर खूप छान दिसतात. पण त्यांच्यावर कोणताही डाग पडू नये म्हणून काळजी घ्यावी लागते. अनेकदा काळजी घेऊनही पांढरे शूज खराब होतातच. अशा वेळी ते स्वच्छ करणे खूप अवघड होऊन जाते. त्यामुळे बहुतांश लोक पांढरे शूज घालणे शक्यतो टाळतात. बरेच दिवस हे शूज स्वच्छ न केल्यास त्यावरील डाग काही केल्या निघत नाहीत आणि शूज जुने दिसू लागतात. अशा वेळी काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही पांढरे शूज अगदी सहज स्वच्छ, चमकदार करू शकता.
पांढरे शूज स्वच्छ करण्याचे सोप्पे उपाय
१) बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
व्हिनेगर, बेकिंग सोडा, स्क्रबिंग ब्रश, काचेचा ग्लास, गरम पाणी, जुना टूथ ब्रश किंवा अॅप्लिकेटर ब्रश
अशा प्रकारे करा शूज स्वच्छ
- एक चमचा बेकिंग सोडा एक चमचा व्हिनेगरमध्ये मिसळा. यात थोडे गरम पाणी मिक्स करा.
- आता ही पेस्ट काही मिनिटांसाठी टूथब्रशने शूजवर स्क्रब करा. शूज खूप मळलेले असल्यास ही प्रक्रिया पुन्हा करा. यामुळे तुमच्या शूजवरील हट्टी डाग निघून जातील.
- यानंतर नॉर्मल पाण्याने शूज धुऊन घ्या.
- आता ते उन्हात नीट वाळवा, बघा तुमचे पांढरे शूज एकदम चमकदार दिसतील.
हेही वाचा : Skin Care Tips : महागड्या फेसवॉशऐवजी फ्रिजमधील ‘हा’ पदार्थ आणू शकतो चेहऱ्यावर नॅचरल ग्लो
२) टूथपेस्ट आणि जुना टूथब्रश
- पांढरे शूजवर जिथे घाण झाले आहेत तिथे टूथपेस्ट लावा.
- सुमारे १५ मिनिटे टूथपेस्ट शूजवर राहू दे.
- यानंतर शूज थंड पाण्याने धुवून घ्या.
३) बेकिंग सोडा, डिटर्जंट, पाणी, जुना टूथब्रश
- बेकिंग सोडा आणि कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर घ्या. त्यात थोडे पाणी घालून त्याची पेस्ट बनवा.
- ही पेस्ट पांढऱ्या शूजवर लावा. या पेस्टने शू-लेसेस देखील लावून घ्या.
- ही पेस्ट शूजवर जवळपास ३० मिनिटे राहू द्या.
- हे पांढरे शूज तुम्ही थंड पाण्याने धुऊन घ्या.
- तुम्ही वॉशिंग मशीनमध्येही शूज धुवून, सुकवून घेऊ शकता. पण यानंतर उन्हात ठेवून चांगले कोरडे करुन घ्यावे लागतील.
