How to Hide Instagram likes: सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर रिल किंवा फोटो पोस्ट केल्यानंतर त्याला मिळणारा लाइक, शेअर आणि चांगल्या कमेंटरुपी प्रतिसाद हा मानवी मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन प्रसवण्यासाठी कारणीभूत ठरतो, हे आता अनेक अभ्यासाअंती समोर आलेलं आहे. डोपामाइन रसायन उत्साह या भावनेला कारणीभूत ठरतं. ज्यामुळे आपल्याला आनंदाची अनुभूती मिळते. कळत-नकळतपणे अनेकजण लाइक्सच्या माध्यमातून मिळणाऱ्या आनंदाच्या जाळ्यात अडकत आहेत. अधिक लाइक्स, म्हणजे अधिक आनंद, हा आता अनेकांच्या जीवनाचा भाग होत चालला आहे. यात विरोधाभास असा की, जेव्हा आपल्याला एखाद्या पोस्टला अपेक्षित प्रतिसाद म्हणजे लाइक्स मिळाल्या नाहीत की मग थोडं वाईट वाटतं. त्यामुळेच इन्स्टाग्रामवर लाइक्सचा पर्याय हाइड करून तुम्ही या दुःखद भावनेपासून स्वतःला दूर ठेवू शकता.

फॉलोअर्सला लाइक न दिसण्यासाठी काय कराल?

इन्स्टाग्रामवर तुमच्या एखाद्या पोस्टला किती लाइक्स मिळाले, हे तुम्ही तुमच्या फॉलोअर्सपासून लपवू शकता. ही ट्रिक वापरली तर इन्स्टाग्राम तुमच्या विशिष्ट पोस्टच्या लाइक्स फॉलोअर्सना दाखविणार नाही. तसेच तुमची पोस्ट किती लोकांनी शेअर केली? हेही इतरांपासून लपवून ठेवता येऊ शकते.

हे वाचा >> लाइक्स आणि डोपामाइन!

इन्स्टाग्रामवर लाइक्सची संख्या लपविणे, ही अत्यंत साधी सरळ सोपी प्रक्रिया आहे. सेंटिग्जमध्ये जाऊन तुम्हाला काही पर्याय निवडायचे आहेत, ज्यामुळे हे शक्य आहे. तुम्ही जर डेस्कटॉपवरून इन्टाग्राम वापरत असाल तर ब्राऊजर, मोबाईलवरून वापरत असाल तर अँड्रॉईड किंवा आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमवरूनही हा पर्याय बंद करता येऊ शकतो.

या सेटिंग्ज लक्षात ठेवा

तुमच्या पोस्ट किंवा रिलचे लाइक न दिसण्यासाठी दोन साध्या गोष्टी कराव्या लागतील. तुम्ही एकतर एखादी पोस्ट पब्लिश करतानाच लाइक न दिसण्याचा पर्याय निवडू शकता किंवा सेंटिग्जमध्ये जाऊन कायमचा लाइक न दिसण्यासाठी तजवीज करू शकता.

पब्लिश असलेल्या पोस्टच्या लाइक अशा पद्धतीने लपवा

मोबाइलवरून इन्स्टाग्रामवर गेल्यानंतर ज्या पोस्टच्या लाइक्स लपवायच्या आहेत, त्या पोस्टला क्लिक करा. त्यानंतर त्या पोस्टच्या वर असलेल्या कबाब मेन्यूला (तीन उभे टिंब) क्लिक करा. या मेन्यूला क्लिक केल्यानंतर सेंटिग्ज खुल्या होतील. तिथे हाइड लाइक काऊंट टू अदर्स (Hide like count to others) हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यास तुमच्या फॉलोअर्सला त्या पोस्टच्या लाइकची संख्या दिसणार नाही.

To hide likes on an existing post
आधीच अपलोड केलेल्या पोस्टच्या लाइक्स कशा लपवाल? (Photo – TIEPL)

तसेच नवीन पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत असताना तुम्हाला ॲडव्हान्स सेंटिग्जमध्ये ‘हाइड लाइक काऊंट’चा पर्याय दिसेल. तसेच इथेच हाइड शेअर काऊट आणि टर्न ऑफ कमेंटिंगचाही पर्याय इथेच तुम्हाला दिसेल.

hide likes on a new post
नवीन पोस्ट अपलोड करताना या गोष्टी करा. (Photo – TIEPL)

या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही इन्स्टाग्रामवर तुमचे नियंत्रण मिळवू शकता. तसेच तुम्ही शेअर केलेल्या पोस्टला किती प्रतिसाद मिळतो, याची फिकीर न करता तुमच्या फॉलोअर्सच्या संपर्कात राहू शकता, त्यांना तुमच्याबद्दलचे अपडेट देऊ शकता.