पावसाळा आपल्याला उष्ण व कोरड्या हवामानापासून दिलासा देता. मात्र, याच पावसाळ्या अनेक संसर्गजन्य आजारांचा प्रसार, जिवाणू संक्रमण व अन्य आजारांचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात प्रामुख्याने होणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यू आणि मलेरिया यांचा समावेश आहे. यातील ‘डेंग्यू’ हा आजार विषाणूजन्य म्हणजे व्हायरसमुळे होतो. डास हे फक्त डेंग्यू पसरवण्याचे माध्यम आहेत. ‘एडिस’ नावाच्या डासामुळे डेंग्यूचा प्रसार होतो. सामान्य डास व एडिस डास यांच्यात नेमका काय फरक आहे? डेंग्यूचा डास चावल्याचे कसं ओळखायचं? डेंग्यूच्या डासांची निर्मिती कुठं होते? या डासांची निर्मिती रोखण्यासाठी आपण नेमकं काय करायला हवं? काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घेणं आवश्यक आहे.

एडिस डास हा लहान व गडद रंगाचा असतो, त्याच्या वाकलेल्या पायावर पांढरे चट्टे असतात. साधारणपणे ते माणसांना घरात चावा घेतात. पाणी साचलेल्या ठिकाणी दिवसा ते अंडी घालतात.या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. पाणी उपलब्ध झाल्यास त्यातून पुन्हा अळी तयार होते. एका अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, एडिस डास प्रामुख्याने दिवसा चावातात. सुर्योदयानंतरच्या दोन तासांमध्ये व सुर्यास्ताअगोदर काही तास हे डास सर्वात जास्त सक्रीय असतात. ते सहसा गुघडे आणि कोपरावर चावा घेतात.

डेंग्यूचा डास चावल्याचे कसे ओळखाल?
आपल्याला साधारण डास चावला आहे, की डेंग्यूचा डास चावला आहे? हे ओळखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, साधारण डासाच्या तुलनेत डेंग्यूचा डास चावल्याची जागा अधिक लाल होते व त्या ठिकाणी खाज देखील सुटते.

एडिस डासांची निर्मिती कुठं होते?
प्रामुख्याने एडिस डास साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. ओल्या राहणाऱ्या फरशा आणि टॉयलेट टँक ही एडिस डासांची निर्मिती होण्यासाठी व सर्वात धोकादायक अशी ठिकाणं आहेत. येथून घरात डासांचा शिरकाव होतो. या शिवाय एखाद्या छताखाली असलेल्या गडद रंगाच्या पाण्याच्या कंटेनरमध्ये देखील हे डास अंडी घालतात.

डेंग्यूच्या तापाची लक्षणं काय?
अचानक खूप जास्त ताप येणं, अंगदुखी, पाठदुखी, सर्दी-खोकला, डोळ्यामागे दुखणे, मळमळ, भूक न लागणे, अशक्तपणा, पोटात दुखणे, सर्व अंगावर पुरळ ही डेंग्यूच्या तापाची प्राथमिक लक्षणं म्हणात येतील. तर, तुरळक प्रमाणात त्वचेतून, नाकातून, तोंडातून रक्तस्त्राव होत असल्यास, प्रचंड अस्वस्थता (मेंदूत ऑक्सिजनची कमतरता) व ओटीपोटात वेदना जाणवत असतील तर तातडीने उपचार घेण्याची आवश्यकता असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डेंग्यूच्या डासांचा प्रतिबंध करण्यासाठी काही सूचना –
१. डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी घर परिसराची स्वच्छता, घराभोवती पाण्याची डबकी साठवू देऊ नये, पाण्याची भांडी नियमीत घासणे, पाण्याच्या भांडय़ाला घट्ट झाकण लावणे, आवारात पडलेल्या टायरमधील पाणी, कुंडय़ातील पाणी, गच्चीत साठलेले पाणी याचा नियमित निचरा करावा. आठवडय़ातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. घरातील सर्व भांडी घासून पुसून कोरडी ठेवावीत. या सर्व गोष्टी पाळल्या तर एडीस डास उत्पत्ती कमी होईल.
२. जर तुम्ही कुलरचा वापर करत असाल, तर याची खात्री करा की ते व्यवस्थितरित्या वेळोवेळी स्वच्छ होईल. त्याचे सर्व फिल्टर्स व्यवस्थित कार्यरत आहेत ना? हे देखील तपासावे.
३. नियमीत पाण्याची भांडी रिकामी करा आणि पाणी जास्त काळ साठवू नका.
४. डास मारण्याचे औषध दररोज घरातील सर्व अडगळीच्या व बंदीस्त अशा ठिकाणी तसेच कोपऱ्यांमध्ये फवारा. जसे की पलंगाच्या खाली, पडद्याच्या मागे, सोफ्याच्या खाली इत्यादी ठिकाणी.
५.डास चावू न देण्यासाठी खिडक्यांना जाळ्या बसवणे, मुलांना लांब हातापायाचे कपडे घालणे, मच्छरदाणी, पंखा यांचा घरात वापर करावा.