How to Update New Mobile Number in Ration Card : आपल्या देशात मोठ्या प्रमाणातील लोकांकडे रेशन कार्ड आहे. रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका असेल तरच तुम्हाला रेशन मिळते. रेशन कार्ड हे सरकारी दस्तऐवज आहे, ज्याचा तुम्ही सरकारी कागदपत्रे काढताना वापर करू शकता. तुमच्याकडे रेशन कार्ड असेल मात्र तुम्ही मोबाइल नंबर नवीन घेतला असेल तर तो अपडेट कसा करायचा, असा प्रश्न अनेकांना पडतो. काही लोक नवीन फोन घेतल्यावर तो अपडेट करायला विसरतात, मग त्यांना रेशन मिळत नाही. कारण रेशन कार्डबरोबर जो नंबर तुम्ही लिंक केला असतो त्यावर ओटीपी येतो.

रेशन कार्डमध्ये असा अपडेट करा नवीन नंबर

तुम्ही जर काही कारणाने नवीन नंबर रेशन कार्डमध्ये अपडेट केला नसेल तर तो कसा करायचा ते आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर तुम्ही घरबसल्या अपडेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. फक्त आठ स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे काम करू शकता. रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या

हेही वाचा – ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता काय? अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? जाणून घ्या

  • सर्वात आधी नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलच्या वेबसाईटवर जा.
  • वेबसाईटवर ‘Citizen’s Corner’ नावाचे एक सेक्शन असते, तिथे जा आणि ‘Register/Change of Mobile No’ वर क्लिक करा.
  • त्यानतंर तुम्हाला स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल.
  • आता घरातील मुख्य सदस्याचा एनएफएस आयडी तिथे टाका. जर तो नसेल तर तुमचा आधार क्रमांक तिथे टाकू शकता.
  • त्यानंतर तुमचा रेशन कार्ड क्रमांक तिथे टाका.
  • रेशन कार्डवर घरातील ज्या मुख्य सदस्याचे नाव लिहिलेले असेल तेच नाव इथे लिहा.
  • आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मोबाइल नंबर. वरील सर्व स्टेप्स पूर्ण केल्यावर तुमचा नवीन मोबाइल नंबर इथे टाका आणि ‘Save’ ऑप्शनवर क्लिक करा.

या स्टेप्स न चुकता पूर्ण केल्या की तुमचा नवीन मोबाइल नंबर रेशन कार्डबरोबर अपडेट होईल.

हेही वाचा – ‘आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन कसे काढायचे? मोफत उपचार कोणत्या आजारांवर होतात, योजनेसाठी पात्रता काय? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑफलाइन मोबाइल नंबर अपडेट कसा करायचा?

जर तुम्हाला नवीन मोबाइल नंबर रेशन कार्डमध्ये ऑनलाइन अपडेट करताना अडचणी येत असेल तर तुम्ही तो ऑफलाइनदेखील करू शकता. तुम्हाला थेट फूड डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुमचा अर्ज सादर करावा लागेल. त्यासोबतच रेशन कार्ड आणि आधार कार्डच्या प्रतीही द्याव्या लागतील. असे केल्यावर काही दिवसात तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डबरोबर अपडेट होईल.