Holiday For Animals : जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये सुट्ट्यांचे वेगवेगळे नियम आहे. यात आठवड्याच्या सुट्टीचेही नियमही वेगळे आहे. काही देशांमध्ये कर्मचाऱ्यांना कामावर एक दिवसाची सुट्टी मिळते. तर काही ठिकाणी दोन दिवसाची सुट्टी मिळते. पण आजवर आपण काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळत असल्याचे ऐकून होतो. पण भारतात असे एक राज्य आहे जिथे जनावरांनाही विक ऑफ म्हणजे साप्ताहिक सुट्टी दिली जाते. या सुट्टी दिवशी जनावरांकडून कोणतेही काम करुन घेतले जात नाही. पण जनावरांना सुट्टी देणारे हे राज्य कोणते आहे आणि त्यांचा यामागे काय उद्देश आहे जाणून घेऊ…
गाय, म्हैस, रेडा, बैल ही जनावरं ही शेतीच्या कामासाठी आणि दूध उत्पादनासाठी वापरली जातात. पण या जनावरांना एक दिवसही आराम न देता त्यांच्याकडून विविध काम करुन घेतली जातात. यामुळे झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात या जनावरांना सुट्टी देण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. जिथे गाय आणि इतर जनावरं जी कामासाठी वापरली जातात त्यांना रविवारी सुट्टी दिली जाते, दर रविवारी सुट्टी असल्याने ही जनावरं शेतात नांगरणीसह इतर कोणतीही काम करत नाहीत. हा पूर्ण दिवस त्यांच्यासाठी सुट्टीचा दिवस असतो. इतर प्राण्यांच्या बाबतीतही तेच आहे. या गावाची ही परंपरा आजपासून नाही तर अनेक दशकांपासून सुरु आहे.
साप आहे की रश्शी! मिलनात गुंग सापांना तरुणीने दोन हातांनी धरले अन्…; थरारक Video एकदा पाहाच
एका मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या १०० वर्षांपासून लोतहार गावात ही परंपरा पाळली जात आहे. जिल्ह्यातील हरखा, मुंगर, परार, लालगडी यासह २० गावांतील लोक रविवारी गुरांसह काम करत नाहीत. या दिवशी त्यांना हिरवे गवत खायला दिले जातात. एवढेच नाहीतर त्यांच्यासाठी खास डिशही बनवली जाते.
या परंपरेमागे एक कारण सांगितले जाते की, १०० वर्षांपूर्वी एक शेतकरी आपल्या बैलाने शेत नांगरत होता, यावेळी बैल मरण पावला. यानंतर तो खूप दु:खी झाला आणि त्याने घरी येऊन सर्वांना सांगितले तेव्हापासून सर्व काम करणाऱ्या जनावरांना आठवड्यातून १ दिवस सुट्टी देण्यात येईल असे ठरले. यावेळी त्यांना कामातून विश्रांती देण्यात येणार असल्याचे सांगितले. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा सुरु आहे.